Saturday, May 4, 2024
Homeनाशिकनांदगाव : कपाशी वेचणीला मजूर टंचाईचे ग्रहण

नांदगाव : कपाशी वेचणीला मजूर टंचाईचे ग्रहण

बोलठाण | Bolthan

बोलठाण सह घाटमाथा परिसरात मोठ्या प्रमाणात कापूस लागवड करण्यात येते.

- Advertisement -

आत्ता कापूस वेचणीचा हंगाम सुरू असल्याने कापूस वेचणी साठी मजूर मिळत नसल्याचे चित्र दिसून येतो.

बोलठाण सह परिसरात सध्या कापूस वेचणी हंगामाला वेग आला आहे. मका सोंगणी, कापूस वेचणी ही कामे एकाच वेळी आल्याने मजुरांची मोठी टंचाई भासू लागली आहे. करोना मुळे परराज्यातील मजूर कमी संख्येने आल्यानी ही मोठी समस्या होत आहे.

परिणामी कापूस वेचणी दर पाच रुपया वरून आठ रुपया पर्यंत पोहचला आहे. आधीच सततच्या पावसाने पिकांची मोठया प्रमाणात नुकसान झाली आहे. लावलेला खर्च व येणार्‍या उत्पन्नात या गणिताचे उत्तर वाजबाकीत येणारे असतांना यात ही मजूर टंचाई व त्यासाठी लागणारे वाढीव दर नक्कीच कंबरडे मोडणारे ठरत आहे.

मका, कांदा, कपाशी यासारख्या पिकांचे मोठे नुकसान झाल्याने उत्पन्नाचे सर्वच गणित चुकल्याने बळीराजा पुन्हा अस्मानी संकटात सापडला आहे. त्यातच मजूर टंचाईने भर घातल्याने सणा सुदीच्या दिवसात ही बाजारापेठेत मंदी दिसून येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या