Saturday, May 25, 2024
Homeनाशिकतोंडाला मास्क नसल्यास लाभार्थ्यांना मिळणार नाही अन्नधान्य

तोंडाला मास्क नसल्यास लाभार्थ्यांना मिळणार नाही अन्नधान्य

नाशिक । प्रतिनिधी

करोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून आता करोना वाॅरियर्स असलेल्या डाॅक्टर, पोलिस यांच्यानंतर आता रेशन दुकानदारही पाॅझिटिव्ह होत आहे. नागरिकांकडून करोना संकट गांभीर्याने घेतले जात नसून तोंडाला मास्क लावले जात नाही.

- Advertisement -

रेशन दुकानदार रोज शेकडो लाभार्थ्यांना अन्न धान्य वाटप करतात. त्यांना देखील करोनाची लागण होण्याची भिती निर्माण झाली आहे. ते बघता रेशन दुकानदारांनी ‘नो मास्क नो रेशन’ अशी भूमिका घेतली आहे. रेशन घेताना नागरिकांनी तोंडाला मास्क लावले नसेल तर अशा लाभार्थ्यास अन्नधान्य दिले जाणार नाही अशी भुमिका स्वस्तवरेशन दुकानदार संघटनेनी घेतली आहे.

राज्यात रेशनची ५२ हजार ४७० दुकाने आहेत. तर नाशिक जिल्हयात त्यापैकी २ हजार ६०० दुकाने आहेत. मागील सहा महिन्यांपासून डाॅक्टर, पोलिस यांप्रमाणे रेशन दुकानदारही जीव धोक्यात घालून अन्नधान्य वाटपाचे काम करत आहेत. मात्र अलिकडच्या काळात रेशन दुकानदार करोना पाॅझिटिव्ह होण्याच्या संख्येत भर पडत आहे.

रोज शेकडो नागरिकांशी अन्नधान्य वाटप करताना रेशन दुकानदारांचा त्यांच्याशी संपर्क येतो. मात्र रेशन दुकानदारांच्या सुरक्षेसाठी शासनाने कोणतिही तजवीज केली नाहि. शासनाने आम्हाला वार्‍यावर सोडले अशी रेशन दुकानदारांची भावना आहे. करोनाने राज्यात आता पर्यंत ३० ते ३५ रेशन दुकानदारांचा मृत्यू झाला.

जिल्हातही करोनाने अनेक दुकानदार बाधीत झाले आहेत. दुकानदाराचा महिन्याला हजारो लोकांशी संपर्क येतो. करोनाचा धोका आता रेशन दुकानदारांच्या घरापर्यंत पोहचला आहे. त्यामुळे दुकानदारी करने . आता जिवावर बेतन्यासारखे असल्याची दुकानदारांची भावना आहे. विमा कवच नाही. कोणतिही सुरक्षा नाही.

म्हणून दुकानदारांनीच स्वता: ची काळजी घ्यावी, सॅनिटायझर मास्क वापर सक्तीचा करावा. रेशन घेणारे बहुतांश लोक गरिब परिवसरातले आहे. रांगेत उभे राहताना तोंडाला मास्क न लावणे, सोशल डिस्टनन्स पाळले जात नाही. ते बघता यापुढे रांगेत उभे असताना तोंडाला मास्क न लावल्यास लाभार्थ्यांना रेशन दिले जाणार नाही असा पवित्रा रेशन दुकानदारांनी एकमताने घेतला आहे.

जिल्ह्यात अनेक रेशन दुकानदारांना करोनाचि लागण झाली असून काहिंचा मृत्यू झाला आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून यापुढे रेशन लाभार्थ्यांनी रांगेत उभे असताना तोंडाला मास्क लावलेले नसल्यास त्यांना अन्नधान्य दिले जाणार नाही अशी भुमिका आम्ही दुकानदारांनी घेतली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या