Saturday, May 4, 2024
Homeराजकीय......असे किती चिखल आले तरी कमळ खुलणारच!

……असे किती चिखल आले तरी कमळ खुलणारच!

रावेर|प्रतिनिधी-raver

भाजपकडून सत्तेसाठी कधी काम केले नाही, जनसंघाचे कार्यकर्ते दोन खासदारापासून संघर्ष करत आले आहे. आज ३०० च्यावर खासदार झाले आहे. भाऊ आमचे नेते आहे, त्यांचा आदर काल-आज आणि उद्या कायम राहील. असे अनेक चिखल आले तरी कमळ खुलणार आहे. आम्हाला कुणाचा विरोध नाही, कुणाशी स्पर्धा नाही, ज्याच्या हाती कमळ त्यांच्या मागे उभे राहणारे कार्यकर्ते असल्याचे प्रतिपादन

- Advertisement -

जिल्हाध्यक्ष राजूमामा भोळे यांनी शुक्रवारी रावेरात दिले. एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने भारतीय जनता पार्टी दक्ष झाली आहे.रावेरवर अधिक लक्ष केंद्रित केलेले असल्याचे देखील जिल्हाध्यक्ष राजूमामा भोळे यांच्या शुक्रवारच्या दौऱ्याने अधोरेखित केले आहे.रावेरात आलेल्या जिल्हाध्यक्षांनी पत्रकारांशी संवाद साधला.त्याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील,माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन,श्रीकांत महाजन,सुरेश धनके,पद्माकर महाजन,मिलिंद वायकोळे,तालुकाअध्यक्ष राजन लासूरकर,माजी तालुकाअध्यक्ष सुनील पाटील,पंचायतसमिती उपाध्यक्ष जुम्मा तडवी,गटनेते पी के महाजन,सिंगत सरपंच प्रमोद चौधरी,पंचायत समिती सदस्या योगिता वानखेडे,महिला आघाडीच्या अध्यक्षा रेखा बोंडे,युवक तालुकाअध्यक्ष महेंद्र पाटील,भरत महाजन,सरचिटणीस सी.एस.पाटील,केऱ्हाळे माजी सरपंच विशाल पाटील व पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्हाध्यक्ष राजूमामा पुढे म्हणाले की,खा.रक्षा खडसे भाजपमध्ये असून येत्या एक दोन दिवसांनी ते मतदारसंघात दौरे करणार आहे.पक्षांवर लोकांचा विश्वास आहे, भविष्यात देखील ते प्रेम कमी होणार नाही.आमची कुणाशी स्पर्धा नाही.कुणाचा विरोध करायचा नाही.फक्त सेवा करायची आहे.भाऊ मोठे नेते आहे,त्यांना उत्तर देण्याएवढ मोठे नसल्याचे देखील ते यावेळी पत्रकारांच्या प्रश्नाला उतर देतांना बोलत होते.

कार्यकर्त्यांनी गुरुवारी नाथाभाऊ यांचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित झाल्यावर भाजपच्या पदाधिकारी यांनी सोशल मीडियात त्यांचे समर्थन केले होते. याबाबत जिल्हाध्यक्ष यांना विचारले असता ते म्हणाले की, राममंदिराच्या वेळी मुस्लिमांनी देखील झेंडे लावली त्यावेळी त्यांचा धर्म बदलला का? कुणावर प्रेम केल्याने धर्म बदलत नाही. हा श्रद्धेचा विषय आहे. कार्यकर्त्यांनी नाथाभाऊचे स्टेट्स बदलले म्हणून विचार बदलत नाही, आम्ही लोकांच्या मनात जाऊन काम करतो, डोळ्यात बसू असे कधीच काम करत नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या