मुंबई |
आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा दादरच्या शिवतीर्थावर झाला. राज्यातील राजकीय स्थिती, विधानसभा निवडणुका, महानगरपालिका निवडणुका, लाडकी बहीण, कुंभमेळा आदी मुद्द्यांवरून मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे काय बोलणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. या सभेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मेळाव्यास मार्गदर्शन करताना आपल्या ठाकरे शैलीत ईव्हीएम, नद्यांचे प्रदूषण, राजकीय परिस्थिती, या अनेक विषयांवर भाष्य केले. या सभेला महाराष्ट्रातील कोनाकोपऱ्यातून मनसैनिकांनी हजेरी लावली.
सभेत मार्गदर्शन करताना सुरवातीस मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ईव्हीएम व नद्यांच्या अवस्थेवरील विषयांवर भाष्य केले. विडीयोच्या माध्यमातून नद्यांची आजची परिस्थिती काय आहे हे दाखविण्यात आले. आता पर्यंत ३३ हजार कोटी रुपये खर्च झालेत. आपल्या नद्या आपण बरबाद करत आहोत. राज्यातील ५५ नदी पट्टे प्रदुषित आहेत. आपल्या नद्या आपणच स्वच्छ ठेवल्या पाहिजे राज ठाकरे म्हणाले.
लाडकी बहीण योजना यामध्ये २१०० रुपये देणार म्हणे. तसं केल्यास ६३ हजार कोटींचं कर्ज होईल. साडेतीन ते चार लाख कोटींचं कर्ज होईल. हे पैसे वाटू शकत नाहीत. त्यामुळे ही योजना बंद होणार असल्याचे राज ठाकरे यांनी म्हण्टले आहे.
रोजगाराचे प्रश्न आहेत, आस्थापना येत आहेत त्यात बाहेरच्या लोकांना भरलं जातं आहे. कारण आम्ही इथल्या मुलांना जातींमध्ये गुंतवलं आहे. आपण आपले मूळ विषयच विसरलो आहोत. औरंगजेबाची कबर, इतिहासावर बोलून फक्त तुमची माथी भडकवून राजकीय पोळी भाजतात. व्हॉट्स मध्ये गुंतवलं आहेत. हे सगळे उद्योग सुरु आहेत. या वर ही मूळ प्रश्नांकडे कुणाचं लक्ष नसल्याचे राज ठाकरे म्हणाले. शेतकरी कर्जमाफी होणार नाही हे काल अजित पवार बोलले आहेत. असं म्हणत राज ठाकरेंनी पुन्हा एकदा सरकारवर टीका केली आहे.
बीड मध्ये संतोष देशमुखांनी सगळ्याला विरोध केला. कारण विषय होता खंडणीचा. खंडणींचा विरोध करणाऱ्यांचा. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, रोजगार निर्मिती होत नाहीत, या सगळ्याकडे दुर्लक्ष व्हावं म्हणून हे सगळं चाललं आहे असाही आरोप राज ठाकरेंनी केला. आहे.
देवेंद्र फडणवीस यांना माझं आवाहन आहे. तुमच्या हाती चांगलं राज्य आलेलं आहे. मराठी माणसाचं हित पाहणार असाल तर आमचा तुम्हाला पाठिंबा आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, रोजगार यांचे प्रश्न आहेत. पाण्याचा प्रश्न आहे. जी असुरक्षितता आली आहे, वैचारिक असुरक्षितता आली आहे. असेही राज ठाकरे म्हणाले
मराठी माणसाला विळखा पडतो आहे. महाराष्ट्रात, मुंबईत मराठीचा मान राखला गेलाच पाहिजे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक बँकेत, प्रत्येक बँकेत मराठी भाषा वापरली जाते आहे की नाही तपासा असं आवाहन राज ठाकरेंनी मनसैनिकांना केली आहे.