मुंबई | Mumbai
कांदा व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे गेल्या सात दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील (Nashik Onion Issue) कांदा लिलाव पूर्णत बंद आहेत. कांदा व्यापाऱ्यांच्या या संपामुळे शेतकऱ्यांचा कांदा चाळीत पडला असून तो सडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाशिक (Nashik) जिल्ह्यातील कांदा प्रश्न ऐरणीवर आला असून आज मंत्रालयात जिल्ह्यातील कांदा व्यापारी, बाजार समिती प्रतिनिधींची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, या बैठकीत व्यापाऱ्यांच्या संपासह शेतकऱ्यांच्या मागणीवर कुठलाही तोडगा निघाला नसून बैठकीत कांद्याच्या विषयावर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे…
Ajit Pawar : “…म्हणून अजित पवार शरद पवारांपासून दूर गेले”; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी झालेल्या बैठकीत कोणताच तोडगा निघालेला नाही. परंतु, या बैठकीत व्यापाऱ्यांच्या संपासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा झाली. त्यानंतर सायंकाळी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांच्याबरोबर चर्चा होणार असल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. तर सात दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या बंद असल्याने शेतकऱ्याचं मोठे नुकसान होत असल्याचे मत मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.
Nashik Rain News : नाशकात पावसाची ‘जोर’ धार; नागरिकांची तारांबळ
तसेच कांद्याच्या प्रश्नाबाबतचा विषय हा केंद्राच्या अखत्यारीतला असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवारांनी थेट केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांना फोन लावला. ते मुंबईमध्येच असल्यामुळे सायंकाळी मुंबईतील सह्याद्री अतिगृहावर या विषयावर बैठक होणार असल्याची माहिती कांदा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष खंडू देवरे यांनी दिली आहे. या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पणन मंत्री अब्दुल सत्तार, अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे उपस्थित होते.
‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
Bus Accident News : छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गावर भीषण अपघात; २९ प्रवाशांसह खासगी बस पूलावरून कोसळली