Saturday, July 27, 2024
Homeनगरबिगर सिंचनाच्या आवर्तनातून गावतळे भरून द्यावेत - परजणे

बिगर सिंचनाच्या आवर्तनातून गावतळे भरून द्यावेत – परजणे

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

पावसाळ्याचे अडीच महिने संपूनही समाधानकारक पाऊन पडला नसल्याने गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रातील खरीप पिके वाया गेली आहेत. गोदावरी कालव्याद्वारे सोडलेल्या बिगरसिंचनाच्या आवर्तनातून लाभक्षेत्रातील गावतळे, बंधारे भरून दिल्यास काही प्रमाणात पाण्याचा प्रश्न सुटू शकतो. या परिस्थितीचा गांभिर्याने विचार करून पाटबंधारे विभागाने गोदावरी उजव्या व डाव्या कालव्याचे पाणी लाभक्षेत्रातील शेतीसाठी सोडावे, अशी मागणी महासंघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी शासनाकडे पत्राद्वारे केली.

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना यासंदर्भात श्री. परजणे यांनी पत्र पाठविले असून त्याद्वारे पाणी टंचाईची परिस्थिती निदर्शनास आणून दिली. गोदावरी कालव्याद्वारे बिगरसिंचनाचे आवर्तन सोडलेले आहे मात्र या पाण्याचा शेतकर्‍यांना काहीच लाभ मिळत नाही.

उलट हे पाणी नदीला मिळून पुढे जायकवाडी धरणाकडे जात आहे. हेच पाणी जर लाभक्षेत्रातील ग्रामीण भागातील गावतळे, ठिकठिकाणच्या बंधार्‍यामध्ये सोडून व ते भरून दिल्यास त्या पाण्याचा पिकांना व पिण्यासाठी चांगला लाभ होऊ शकतो. या गंभिर समस्येचा विचार होऊन बिगर सिंचनाच्या आवर्तनातून गावतळे, बंधारे भरून द्यावेत अशीही मागणी श्री. परजणे पाटील यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या