मुंबई | Mumbai
राज्यात हिंदी सक्तीच्या (Hindi Compulsory) विषयावरुन सध्या राजकारण चांगलेच तापल्याचे बघायला मिळत आहे. यावरून येत्या ५ जुलै रोजी ठाकरे बंधू (Thackeray Brother) मुंबईत (Mumbai) एकत्र मोर्चा काढणार आहेत. पहिली ते चौथी पर्यंत प्राथमिक शिक्षणात हिंदी भाषा सक्तीची नको, त्या विरोधात हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे म्हणणे आहे. अशातच आता उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच बनेल असे म्हणत आव्हान दिले आहे. त्यामुळे राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.
उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला (Sunil Shukla) म्हणाले की, “राज ठाकरे (Raj Thackeray) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि भाजपनेही (BJP) कितीही कार्यक्रम घेतले तरी मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार आहे. उत्तर भारतीय यावेळी जागरूक झाला आहे. हे हिंदू विरोधी आणि हिंदीविरोधी लोक आहेत. सर्व उत्तर भारतीय एकत्रित येत उत्तर भारतीय उमेदवाराला जिंकवतील. येत्या काळात उत्तर भारतीय विकास सेनेचे उमेदवार मुंबईत जिंकतील आणि आमचाच महापौर बनेल?”, असा दावा त्यांनी केला आहे.
दरम्यान, याआधी सुनील शुक्ला यांनी संपूर्ण मुंबईत (Mumbai) २ कोटी २० लाख लोकसंख्या आहे. त्यातील १ कोटी मराठी, १ कोटी उत्तर भारतीय आणि २० लाख इतर राज्यातील लोक आहेत. मराठी समाज ५ पक्षांमध्ये विभागला गेला आहे. जर आपण उत्तर भारतीय उमेदवार उभे करत असू त्याला निवडणूक (Election) लढवून जिंकवत असू. १० टक्क्यां पैकी ३ टक्के लोकांनीही उत्तर भारतीय उमेदवारांना मतदान केले तर आपला महापौर (Mayor) बनेल. मराठी समाजाची १०० टक्के मते ५ पक्षात विभागली, त्यांनी २०-२० टक्के मते घेतली तरी आपण जिंकू शकतो असा विश्वास मुंबईतील मतांचे गणित मांडून सुनील शुक्ला यांनी महापौरपदाबाबत व्यक्त केला होता.




