Friday, November 15, 2024
Homeब्रेकिंग न्यूजकृतज्ञता नव्हे तर माझ्यासाठी आशीर्वाद सोहळा- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कृतज्ञता नव्हे तर माझ्यासाठी आशीर्वाद सोहळा- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महानुभाव संप्रदायाच्या सर्व मागण्या पूर्ण करणार

नाशिक | प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

देशात असा कोणता जिल्हा किंवा गाव नाही की जेथे महानुभाव पंथाचे घर नाही. महानुभाव पंथाच्या विकास कामांसाठी जी काही मदत करता आली ते माझे भाग्य समजतो. हा कृतज्ञता सोहळा नसून, एक प्रकारे माझ्यासाठी आशीर्वाद सोहळा असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
अखिल भारतीय महानुभाव पंथाद्वारे शनिवार दि. २८ रोजी महाकवी कालिदास कला मंदिर येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भव्य सत्कार व कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता त्या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महंत कारंजेकर बाबा ( अमरावती ) उपस्थित होते. तर व्यासपीठावर महंत वर्धनस्थ बाबा बिडकर (रणाईचे ), विद्ववंसबाबा शास्त्री (फलटण ) ,पारीमांडल्य आश्रमाचे महंत लासुरकर बाबा, महंत शेवलीकर बाबा (शहादा ), महंत जामोदेकर बाबा (गाजियाबाद ), महंत आंबेवडगावकर बाबा (पाचोरा ), महंत चिंचोडीकर बाबा (जाळीचादेव ), महंत सुकेणेकर बाबा (सुकेणे ), महंत सातारकर बाबा (फलटण ), माजी आ बाळासाहेब सानप, अविनाश ठाकरे,दिनकर पाटील, प्रकाश नन्नवरे, राजेंद्र जय भावे, महंत बाभूळगावकर शास्त्री (छत्रपती संभाजीनगर ), महंत कापूसतळणीकर बाबा (फलटण ) महंत नागराज बाबा उपाख्य तपस्विनी आत्याबाई कपाटे (छत्रपती संभाजीनगर ) महंत लाड बाबा, महंत संतोषमुनी कपाटे, महंत नांदेडकर बाबा, महंत गुजर बाबा, महंत राजधर बाबा, महंत बदनापूरकर बाबा आदींसह संत महंत उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,अध्यात्मिक आणि सज्जन शक्ती एकत्र येत असेल तर त्यांचा आशीर्वाद घेण्याची संधी मला मिळाली आहे . ३२ वर्षांपासून महानुभव पंथा सोबत सबंध आहे. अनेक ठिकाणी स्थानांना भेटी दिल्या . अतिशय निस्वार्थ भावनेने लोक काम करताना दिसतात. आठशे वर्षांपूर्वी गुलाम बनवण्याचे काम सुरू होते तेव्हा चक्रधर स्वामी यांनी अतुलनीय काम केले. समाज हा मातीच्या भिंतीत होत नाही समाज घडवण्याचे काम अटकेपार विचार नेण्याचे काम महानुभव पंथाने केला. अनेक धार्मिक स्थळांवर अतिक्रमण झाले , स्मशानभूमीवर अतिक्रमण झाले ,अनेक ठिकाणी अडचणी आलाय आपण शक्ती कधीच कमी होऊ दिली नाही. अनेक अडचणी असतानाही या पंथाने कधी आंदोलन अथवा मोर्चा काढला नाही असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. या वेळी सर्व महानुभव साहित्य डिजिटल स्वरूपात आणण्यासाठी सरकार पूर्ण पने मदत करेल असेही त्यांनी सांगितले.यावेळी राज्यभरातील महानुभव संत महंत, अनुयायी उपस्थित होते.

पहिले मराठी विद्यापीठ रीद्धपुरला होणारच

मराठीचा सन्मान करण्याचा शिकवले त्या रीद्धपुर जिल्हा अमरावती येथे विद्यापीठ झाले पाहिजे असे उपमुख्यमंत्रीफडणवीस यांनी सांगितले. त्यासाठी आपण आग्रही असून, त्या दिशेने काम सुरू आहे. मधल्या काळात सरकार बदलल्या मुळे अडचणी आल्या आहेत. महविकस आघाडीने मुंबईत मराठी विद्यापीठ निर्माण करण्याची तयारी सुरू केली होती. परंतु. चक्रधर स्वामी यांच्या आशीर्वादाने पुन्हा आपले सरकार आले अन् या कामाला गती मिळाली. तुम्ही सर्व पाठीशी असल्याने आता पुन्हा एकदा आपले सरकार येणार असून त्या ठिकाणी होणारे पहिले मराठी विद्यापीठ होईल. ते पाहण्याकरिता देशभरातील लोक येतील असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.

आमच्या बाळासाहेबांना बळ द्यावे
यावेळी महंत करंजेकर बाबा यांनी भाषणाच्या समारोपात महानुभव पंथाच्या कार्यासाठी बाळासाहेब सानप यांचा सिंहाचा वाटा असल्याचे सांगितले.. त्यांच्या प्रेरणेतून, मदतीमुळे भव्य दिव्य असे कार्यक्रम झाले आहेत. अशा बाळासाहेबांना आगामी काळात राजकीय बळ द्यावे अशी साद उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे घातली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या