Monday, September 23, 2024
Homeमुख्य बातम्या'त्या' वृद्धेची आत्महत्या नव्हे तर खून; पोलिसांच्या तपासात निष्पन्न

‘त्या’ वृद्धेची आत्महत्या नव्हे तर खून; पोलिसांच्या तपासात निष्पन्न

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

- Advertisement -

दाभाडीलगत असलेल्या गिसाका कॉलनीत राहणार्‍या सुलकनबाई किसन सोनवणे (79) या वृध्द महिलेचा नायलॉनच्या दोरीने गळफास घेतलेला मृतदेह घरात आढळून आला होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करीत चौकशीस प्रारंभ केला असता मिळालेल्या माहितीवरून सदर वृध्देचे पुत्र भगवान किसन सोनवणे (45) व संदीप किसन सोनवणे (42) या दोघांना ताब्यात घेत विचारपूस सुरू केली होती.

प्रारंभी उलटसुलट उत्तर देणारे व आत्महत्या केल्याचे सांगणारे भगवान व संदीप यांच्यावर पोलिसांचा संशय बळावून त्यांना पोलीसी खाक्या दाखवताच त्यांनी नायलॉनच्या दोरीने पैसे देत नसल्यामुळे आईचा खून केल्याची कबुली दिली.

या दोघांना मद्याचे व्यसन असल्याने ते वृध्द आईकडे सतत पैशांची मागणी करत व ते न दिल्यास मारहाण करीत असत. यातूनच 30 जानेवारीरोजी पैसे न देणार्‍या आईचा त्यांनी नायलॉनच्या दोरीने खून केला व आत्महत्या केल्याचा बनाव रचला होता.

मात्र पोलिसांनी समयसुचकता दाखवित केलेल्या तपासामुळे या खुनाचा उलगडा एका दिवसात होवू शकला. याप्रकरणी राहुल हिरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोघांविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सपोनि पाटील हे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या