Wednesday, June 17, 2026
Homeनगरचार उमेदवारांना नोटीस; विखे व लंकेकडून खर्चातील तफावत मान्य

चार उमेदवारांना नोटीस; विखे व लंकेकडून खर्चातील तफावत मान्य

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची खर्चाची प्रथम तपासणी शुक्रवार (दि.3) रोजी झाली. यावेळी 25 उमेदवारांपैकी चार उमेदवार अथवा त्यांच्या प्रतिनिधींनी निवडणूक यंत्रणेला खर्चाचा तपशील सादर करणे टाळले. यामुळे संबंधितांना शनिवारी (दि.4) नोटीस काढण्यात आली. यात उमाशंकर श्यामबाबू यादव, अमोल विलास पाचुंदकर, रावसाहेब शंकर काळे व दिलीप कोंडीबा खेडकर या उमेदवारांचा समावेश आहे.

- Advertisement -

दरम्यान, 25 उमेदवारांपैकी 21 उमेदवारांनी उमेदवारी दाखल झाल्यापासून आतापर्यंत केलेला खर्चाचा तपशील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या यंत्रणेला सादर केला. निवडणुकीतील प्रमुख उमेदवार असणार्‍या भाजपचे डॉ. सुजय विखे पाटील आणि शरद पवार राष्ट्रवादीचे उमेदवार नीलेश लंके यांच्यावतीने सादर करण्यात आलेला खर्च आणि निवडणूक विभागाकडे असणार्‍या खर्चाच्या तपशील यात तफावत आढळून आला. यात दोनही उमेदवार यांच्यावतीने सादर केलेला खर्च कमी तर निवडणूक यंत्रणेकडे नोंदी असणारा खर्च जादा आढळून आला. जादा झालेला खर्च दोनही उमेदवारांच्यावतीने मान्य करण्यात आला असल्याने हा विषय संपवण्यात आला असल्याचे निवडणूक खर्च निरिक्षकांच्यावतीने सांगण्यात आले.
नगर लोकसभा मतदारसंघातील सर्व उमेदवारांची निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी जिल्हाधिकारी कार्यालय येथे खर्च निरीक्षक शक्ती सिंग यांच्या उपस्थितीत पार पडली.

यावेळी 21 उमेदवारांनी खर्च सादर केला तर 4 उमेदवार अनुपस्थित असल्यामुळे त्यांना निवडणूक आयोग यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याद्वारे नोटीस देण्यात आलेली आहे. निरीक्षक शक्ती सिंग यांनी स्वतः सर्व उमेदवारांच्या खर्चाच्या नोंद वह्याची तपासणी केली. या तपासणीनंतर उमेदवारांच्या खर्चाचे दैनंदिन नोंदवही निवडणूक आयोग यांच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली. आता दुसरी तपासणी 7 मे रोजी पार पडणार आहे, या तपासणीसाठी सर्व उमेदवारांनी त्यांच्या खर्च नोंदवही व इतर अनुषंगिक कागदपत्रे यासह उपस्थित राहावे, असे आवाहन खर्च निरीक्षक शक्ती सिंग यांनी केले आहे. यावेळी नोडल अधिकारी (खर्च) शैलेश मोरे, सहाय्यक खर्च निरीक्षक अजय कुमार, सहाय्यक समन्वय अधिकारी (खर्च) विशाल पवार, भाग्यश्री जाधव, राजू लाकूडझोडे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

Rajabhau Waje : “…अन् खासदार वाजेंच्या डोळ्यात आलं पाणी”; संजय ...

0
नवी दिल्ली | New Delhi गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात चर्चेत असलेले 'ऑपरेशन टायगर' यशस्वी झाले आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या (Shivsena UBT) नऊ पैकी सहा...