अरुण पाटील
यावल – Yaval
यावल तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेचे Sanjay Gandhi Niradhar Yojana श्रावण बाळ Shravan Bal चे प्रकरण तयार करण्यासाठी व गरजू लाभार्थ्यांकडून पैसे उकडून आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी काही ” दलाल ” Broker कार्यरत असून तलाठी व ग्रामसेवक यांच्या खोट्या सह्या False signatures करून प्रकरण तयार करून यावल तहसील Yawal Tehsil कार्यालयाकडे पाठवण्यात येत असल्याचे वृत्त हाती आले असून तहसील कार्यालयाकडून अशा खोट्या व बनावट सह्या यांचे प्रकरण तयार केल्याप्रकरणी नायगाव तालुका यावल येथे काही लाभार्थ्यांना नोटिसा Notice बजावण्यात आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे
यावल तालुक्यात नायगाव गावी बत्तीस लाभार्थ्यांचे श्रावणबाळ योजनेचे प्रकरण यावल तहसीलदार कार्यालयामध्ये पाठविण्यात आलेले होते त्यात तपासणी व पडताळणी साठी तलाठी नायगाव यांच्याकडून तहसील कार्यालय मध्ये शहानिशा करण्यात आली त्यात या प्रकरणांवर तलाठी नायगाव यांच्या शिक्के व सह्या त्यांनी केलेल्या नाही व शिक्के मारले नाही आणि मात्र प्रकरण हुबेहूब बनावट शिक्के व सह्या करून तहसील कार्यालयाला प्रकरणं जमा करण्यात आलेली होती
बनावट शिक्के मारून प्रकरण कोणत्या महा ई सुविधा केंद्रामार्फत जमा झाले? हा आता चर्चेचा विषय झाला असून यासंदर्भात ज्या लाभार्थ्यांनी प्रकरण तयार करून पाठवलेली होती त्यांना तहसील कार्यालयाकडून कोतवाल मार्फत नोटिसा बजावण्यात आल्या ने एकच खळबळ उडालेली आहे .याबाबत तहसीलदार महेश पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्ताचा दुजोरा दिला आहे
नायगाव गावात ही प्रकरणे नेमकी कोणी तयार केली? बनावट सह्या व शिक्के मारणारा कोण? कोणत्या सुविधा केंद्रामार्फत ही प्रकरण तहसील कार्यालयात जमा झाली? याबाबत आता पडताळणी करण्यात येत असून या प्रकरणावर पडदा न टाकता व राजकीय दबावाला न घाबरता प्रशासनाने आता यासंदर्भात उचित पावले उचलावीत जेणेकरून खऱ्या लाभार्थ्यांना लाभ मिळेल याच धर्तीवर पूर्ण तालुक्यामध्ये जे काही “दलाल ” कार्यरत आहेत त्यात साकळी, दहिगाव, किनगाव, पाडळसे, भालोद, हिंगोना, न्हावी या मोठमोठ्या गावांमधील बरेच “दलाल ” यामध्ये गुंतलेले दिसतात साधे रेशन कार्ड बनवायचे असले तर बाहेर 2 हजार रुपयापर्यंत घेतले जातात अशी चर्चा आहे तर संजय गांधी श्रावणबाळ या योजनेसंदर्भात अनेक “दलाल ” उघडउघड प्रकरण तयार करताना तालुका भर दिसतात
समितीसमोर कागदाला कागद असला म्हणजे प्रकरण पास होतात त्यात समितीचा दोष नाही मात्र तालुकाभरातील तलाठ्यांनी ज्या दाखल्यावर सह्या केलेले आहेत त्याची स्वतंत्र रजिस्टर जर ठेवले आणि त्याला जावक नंबर दिला व या प्रकरणाची पडताळणी केली तरच अशा प्रकरणांना आळा बसेल
यावल तालुक्यात अशी प्रकरण तयार करणारे कोण ?दररोज या कार्यालयांमध्ये जे नेहमी येणारे चेहरे आहेत ते काय काम करतात? हे तहसील कार्यालयामध्ये कॅमेऱ्यामध्ये कैद असते एखाद्या दिवशी त्यांची मोहीम राबवून यांनाच का या कार्यालयात वारंवार काम पडते? हे कशासाठी येतात ?व प्रकरण करत असतील तर त्या प्रकरणा वाल्यांकडून काही मलिदा घेतात का? त्यात काही कार्यालयातील कर्मचारी व अधिकारीही सामील आहेत का? याचा शोध घेणे हे महत्त्वाचे असून तहसीलदार यावल यांनी याबाबत लक्ष घालावे व कायदेशीर कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे