Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्याकाझीगढीवरील रहिवाशांना नोटिसा

काझीगढीवरील रहिवाशांना नोटिसा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिकच्या काझीगढीचा प्रश्न गंभीर होऊ लागलेला असून, प्रशासनाद्वारे ते रिकामे करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात असले तरी, नागरिक मात्र तेथून हलण्यास तयार नसल्याने तिढा वाढत असल्याचे चित्र आहे.

- Advertisement -

जुन्या नाशिकमधील काझी गढीवर मोठ्या प्रमाणात वसाहत आहे. यात 100 ते 150 झोपड्या आहेत. त्यातील सुमारे 50 झोपड्या धोकादायक स्थितीत आहेत. त्यांच्या तळाला असलेली जमीन मजबूत राहिलेली नसल्याने ती जागा मुसळधार पावसात धसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आपोआपच या नागरिकांची सुमारे 50 घरे कोलमडून पडण्याची भिती आहे. त्या दुर्घटनेपासून वाचण्यासोबतच नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या दृष्टीने हालचाल करणे गरजेचे आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

मनपाच्या अधिकार्‍यांनी सातत्याने या भागात जाऊन रहिवाशांची मनधरणी करण्याचे काम सुरु होते. मनपा आयुक्त भाग्यश्री बानायत, विभागीय अधिकारी व उपायुक्त नितीन नेर नगररचना कार्यकारी अभियंता संजय अग्रवाल यांनी या परिसरात भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला.

मनपाच्या माध्यमातून तातडीने रिकामे करण्याच्या नोटिसा या घरांना चिकटवण्यात आल्या आहेत. घर खाली न केल्यास पाणी व वीज कापण्याचे निर्देशही देण्यात आले आहे. नागरिकांना सातत्याने सूचना देण्यात आलेल्या आहेत. कर्मचार्‍यांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला आहे. शेवटी पोलीस बळाचा वापर करुन कारवाई करावी लागणार आहे.

– नितीन नेर, उपायुक्त अतिक्रमण

आमचे हातावरचे पोट आहे. कोणीच नोकरीला नाही. आज कमवून उद्या खायचे राहते. आम्ही कुठे जायचे? धोका असला तरी आज ना उद्या मरायचेच आहे. देवच काय ते करील.

-मनिषा जाधव, रहिवासी

- Advertisment -

ताज्या बातम्या