Wednesday, November 20, 2024
HomeUncategorizedआता 'समृद्धी'वर आरटीओचा २४X७ पहारा

आता ‘समृद्धी’वर आरटीओचा २४X७ पहारा

छत्रपती संभाजीनगर- Chhatrapati Sambhajinagar

समृद्धी महामार्गावर होणारे अपघात टाळण्यासाठी आता आरटीओने २४ तास पहारा देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी आता आरटीओची दोन पथके तैनात करण्यात आल्याची माहिती प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे यांनी दिली. शिवाय वाढत्या अपघाताचा धोका लक्षात घेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मदतीने या मार्गावरील अनेक टर्निंग पॉईंट बंद करण्यात येत आहेत.  

- Advertisement -

समृद्धी महामार्गाच्या कंत्राटदाराने आरटीओ आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या सूचनेनंतर रस्त्याच्या डिव्हायडरच्या बाजूला अनेक ठिकाणी लोखंडी कठडे लावले आहेत. यामुळे वेगात आलेले वाहन हे डिव्हायडरवर आदळू नये. यासाठी हे नियोजन करण्यात आले आहे. या मार्गावर ठिकठिकाणी टर्निंग पॉईंट देण्यात आले होते. पूर्वी हे टर्निंग पॉईंट खुले होते. अनेक वाहने या टर्निंग पॉईंटला वळण घेऊन येत होते. यामुळे अपघाताचा धोका वाढलेला होता. हे टर्निंग पॉईंटही बंद करण्यात आले आहे.

समृद्धी महामार्ग वाहतुकीला खुला झाल्यापासून आतापर्यंत अनेक अपघात झाले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या ११२ किलोमीटरच्या हद्दीत आतापर्यंत नऊ अपघातांत १६ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर १२ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. हे अपघात कमी करण्यासाठी काही उपाययोजना करण्यात आल्या आहेत. वाहनचालकांसाठी माळीवाडा येथील पॉईंटवर समुपदेशन केंद्र सुरू केले आहे. लेन कटिंग, ओव्हर स्पीड वाहनचालकांना या केंद्रावर अपघाताचा व्हिडिओ दाखविला जातो. तसेच चालकाकडून शपथपत्र भरून घेतले जाते आणि शपथ म्हणवून घेतली जाते. तर वेरुळ पॉईंटवर वाहनांची टायर तपासणी केली जात आहे. आतापर्यंत तब्बल ५ हजार २८० वाहनांची तपासणी करण्यात आली असून टायर खराब असलेल्या ३२१ वाहनांना परत पाठवले आहे.

दरम्यान, ऑन रोड वाहन तपासणीही सुरू आहे. हायस्पीड असलेली हाती न लागलेली वाहने किंवा लेन कटिंग करून धावणाऱ्या वाहनांचे क्रमांक संगणकीय लिंकवर टाकले जातात, अशी वाहने टोलनाक्यावर आल्यावर मोठा सायरन वाजतो, त्यामुळे त्यांना थांबवून कारवाई केली जाते. आरटीओ पथकांनी वाहनांना दोषी ठरवून संगणकीय लिंकवर क्रमांक नोंद केलेल्या २१६ व वाहनचालकांचे कौन्सिलिंग करण्यात आले.

आरटीओ विभागाकडून ही कारवाई होत असतानाही काही अपघात झालेले आहेत. या अपघाताची दखल घेऊन समृद्धी महामार्गाच्या कंत्राटदाराने आरटीओ आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या सूचनेनंतर रस्त्याच्या डिव्हायडरच्या बाजूला अनेक ठिकाणी लोखंडी कठडे लावले आहेत. यामुळे वेगात आलेले वाहन हे डिव्हायडरवर आदळू नये. यासाठी हे नियोजन करण्यात आले आहे. या मार्गावर ठिकठिकाणी टर्निंग पॉईंट देण्यात आले होते. पूर्वी हे टर्निंग पॉईंट खुले होते. अनेक वाहने या टर्निंग पॉईंटला वळण घेऊन येत होते. यामुळे अपघाताचा धोका वाढलेला होता. हे टर्निंग पॉईंटही बंद करण्यात आले आहे.

आणखी दोन पथके
समृद्धी महामार्गावर हेात असलेले अपघात रोखण्यासाठी दोन पथके नेमण्यात आले आहे. ही पथके दिवसा आणि रात्रीच्या वेळी वाहनांची तपासणी करीत आहेत. यात वेरूळ पॉईंट आणि माळीवाडा पॉईंट अशा दोन पॉईंटचा समावेश आहे. वेरूळ येथे टायर तपासणी, तर माळीवाडा पॉईंट येथे समुपदेशन केंद्र आहे. याशिवाय या ठिकाणी वाहतूक नियम तोडणाऱ्या वाहनांवर कारवाई करीत आहेत, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे यांनी दिली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या