आता गरज आहे पोलीस यंत्रणेचे मनोबल वाढवण्याची…आता गरज आहे वैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविण्याची…आता गरज आहे स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढण्याचे……आता गरज आहे प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्याची…….
खरं म्हणजे आमच्यासाठी तुम्ही आदरणीयच आहात. प्रत्येक संकटाच्या काळात फक्त तुम्हीच आमच्यासाठी उभे राहतात, मात्र आम्ही तुमचं ऐकत नाही हा भाग वेगळा….
आज बरेच भारतीय तुम्ही नाही म्हणत असतानाही घराबाहेर पडत आहे याला कारण वेगळे असतील कुणाचे वैयक्तिक काम असेल, कुणाला घरात करमत नसेल, कुणाचा व्यवसायाच्या दृष्टीने बाहेर जाण्याची आवश्यकता असेल, काही वैयक्तिक विविध कारणांमुळे बाहेर जात असतील, मात्र काही अनावश्यक देखील असतील…पण तुम्ही तुमचे मनोबल खचवू नका…!
हा भारतीय समाज आहे… इतिहास पहिला तर हा समाज प्रत्येक वेळी तुमच्या पाठीशी उभा राहिलेला आहे. तसा आज देखील राहणार तुम्ही मात्र तुमचे म्हणून मनोबल खचवू नका…
मुंबई थांबली, नागपूर थांबलं, पुणे थांबलं, नाशिक थांबलं ही सर्व किमया तुमचीच.. भारतात तरी चीन, इटली, इराणसारखी परिस्थिती निर्माण होणार नाही ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळे हे संपूर्ण जगाला मान्य करावे लागेल. आता आदेश असतील हे अधिकारी आणि मंत्र्यांचे पण मैदानावर खरं काम तुम्ही करताय आणि याचे सर्व श्रेय मी तरी तुम्हाला देतो.
माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे तुम्ही उपाशी पोटी व शारीरिक निष्काळजीपणाने काम न करता स्वतःची काळजी घ्या स्वतःची रोगप्रतिकारशक्ती वाढवा.
कोरोनापेक्षा भयंकर असलेली समस्या म्हणजे वायु प्रदूषण त्यापासून बचाव करण्यासाठी तुम्हाला वैयक्तिक पातळीवर काय काळजी घेता येईल ती घ्या लवकरच तुमच्या साठी काही करण्याचा विचार आहे तो अमलात आणण्याचा प्रयत्न करेन आता यात समाज सहकार्य करेन किंवा नाही करणार तो भाग वेगळा.
मात्र, त्या समाजाचा एक भाग किंवा भारतीय समाजाचा प्रतिनिधी म्हणून तुमच्यासाठी काहीतरी करणे हे माझे आद्य कर्तव्य आहे. कुठल्याही प्रसिद्धीचा हव्यास मनात नाही किंवा कुठलेही काम प्रसिद्धी शिवाय करायचे हे मनाशी बाळगून तुम्ही नकार देत असताना देखील तुम्हाला भेटायला येईल.
मात्र, पुन्हा एकदा विनंती करतो की, तुमचे मनोबल खचवू नका या ४०० मायक्रोनच्या किड्याला मारण्यासाठी भारतीय समाज तुमच्या पाठीशी नक्की उभा राहिल याची मी खात्रीवजा हमी देतो
योगेश अशोक चकोर, शिक्षक
भोसला मिलिटरी स्कूल
नाशिक-०३