Sunday, June 23, 2024
HomeUncategorizedआता घराघरांवर लागणार 'डिजिटल ऍड्रेस'!

आता घराघरांवर लागणार ‘डिजिटल ऍड्रेस’!

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar)

- Advertisement -

महानगरपालिकेच्या वतीने दिल्या जाणार्‍या सोयीसुविधांसाठी नागरिकांना सतत कार्यालयांच्या खेट्या माराव्या लागू नयेत. सर्व सुविधा घरपोच देता याव्यात, यासाठी महानगरपालिकेने शहरातील प्रत्येक घरावर डिजिटल ऍड्रेस लावणार असून त्याची नोंद मनपाच्या ऍपमध्ये केली जाणार असल्याची माहिती महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्‍त जी. श्रीकांत (Commissioner G. Srikanth) यांनी दिली. 

महापालिकेचा समावेश केंद्राने स्मार्ट सिटी योजनेत केला आहे. त्यामुळे मागील सहा वर्षांपासून शहर स्मार्ट करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. मात्र, सोळा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या या शहरात बाहेरगावाहून येणाऱ्यांची साधा पत्ता शोधताना दमछाक होते. परंतु, हा त्रास कमी करायचा असेल तर प्रत्येक मालमत्ता धारकाच्या घरावर एकाच पद्धतीचे डिजिटल ऍड्रेस असायला हवे, त्यासाठी काय करता येईल याचा विचार सध्या महानगरपालिका प्रशासन करीत आहे.

याबाबत माहिती देताना प्रशासक जी. श्रीकांत यांनी सांगितले की, महापालिकेच्या विविध विभागांचा आढावा घेतल्यानंतर लक्षात आले की महानगरपालिकेच्या कामकाजात टेक्नॉलॉजीचा वापर अतिशय कमी प्रमाणात होतो. परंतु, टेक्नॉलॉजीचा वापर वाढवणे तितकेच गरजेचे आहे. 

एका क्लिकवर पत्ता मिळेल
ऐतिहासिक आणि पर्यटनाची राजधानी असलेल्या शहरात दरवर्षी ३० लाखांहून अधिक देशी-विदेशी पर्यटक येतात. यातील बहुतांश पर्यटक शहरात फिरतात. बाजारात खरेदीसाठी येतात. त्यांच्यासह बाहेरगावाहून आलेल्यांना पत्ता विचारत फिरावे लागते. परंतु, डिजिटल ऍड्रेस लावण्यात आल्यास नागरिकांवर पत्ता विचारण्याची वेळ येणार नाही. ऍपमध्ये क्लिक करताच पत्ता व त्याकडे जाणारा मार्ग लक्षात येईल. 

- Advertisment -

ताज्या बातम्या