Saturday, May 4, 2024
Homeमुख्य बातम्याआता लासलगावचा कांदा डाक पाकिटावर

आता लासलगावचा कांदा डाक पाकिटावर

लासलगाव । वार्ताहर Lasalgaon

कांद्याचे (Onion) नाव जरी काढले तर भल्याभल्यांच्या डोळ्यात पाणी येते. आशिया खंडात प्रसिद्ध असलेला लासलगावचा (Lasalgaon) कांदा आता चक्क डाक विभागाच्या (Postal Department) पाकिटावर छापला जाणार आहे. शुक्रवारी लासलगाव पोस्ट कार्यालयात (Lasalgaon Post Office) झालेल्या ‘लासलगाव प्याज’ (Lasalgaon Pyaj) या विशेष पाकिटाचे अनावरण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

- Advertisement -

राज्यात सर्वाधिक कांद्याचे उत्पादन (Onion production) नाशिक जिल्ह्यात (Nashik District) होते. साहजिकच येथील शेतकर्‍यांनी (Farmers) पिकविलेल्या कांद्याला परदेशी बाजारपेठेत देखील मोठी मागणी असते. येथील कांद्याने आपल्या चवीमुळे भल्याभल्यांना भुरळ घातली आहे. कधी हसवणारा तर कधी रडवणार्‍या या कांद्याची दिल्लीतील सरकार उलथवण्याची ताकद देखील आहे.

साहजिकच या कांद्याला आंतरराष्ट्रीय स्थळावर ऐतिहासिक व पारंपारिक मुल्य प्राप्त होऊन हा कांदा जागतिक स्तरावर पोहचवावा व लासलगावच्या कांद्याचा वारसा जतन व्हावा यासाठी भारतीय टपाल विभागाने पुढाकार घेत ‘लासलगाव प्याज’ हे विशेष टपाल पाकिट काढले असल्याची माहिती मालेगाव पोस्ट विभागाचे अधीक्षक नितीन येवला यांनी दिली आहे.

साहजिकच लासलगावचा कांदा हा पोस्ट विभागाच्या मार्फत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भरारी घेणार आहे. ऐतिहासिक आणि पारंपारिक मूल्य असलेल्या स्थानिक बाजारपेठेच्या उत्पादकांना जी.आय (जिऑग्राफिकल इंडिकेशन) लासलगावच्या कांद्याला मिळाल्याने पोस्ट खात्यामार्फत त्याचे ब्रॅण्डींग केले जाणार असल्याने लासलगावच्या कांद्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वेगळी ओळख निर्माण होणार आहे.

लासलगाव पोस्ट कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात ‘लासलगाव प्याज’ या विशेष टपाल पाकिटाचे अनावरण मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा लासलगाव ग्रामपंचायत जयदत्त होळकर, लासलगाव बाजार समिती सभापति सुवर्णा जगताप, मालेगाव पोस्ट विभाग अधीक्षक नितीन येवला, लासलगाव व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नंदकुमार डागा, बळीराजा गटाचे अध्यक्ष राहूल पाटील, बाजार समिती सचिव नरेंद्र वाढवणे, लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहूल वाघ, कांदा व्यापारी हेमंत राका, चांदवडचे डाक निरीक्षक आर.एन. वानखेडे यांचेसह लासलगाव परिसरातील ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या