छत्रपती संभाजीनगर – Chhatrapati Sambhajinagar
छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर (Railway station) रेल्वे विभागाच्या वतीने इकॉनॉमी मील संकल्पना राबविण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना दर्जेदार अन्न मिळणार आहे. इकॉनॉमी मीलची किंमत २० रुपये तर कॉम्बो जेवणाची किंमत ५० रुपये मोजावे लागणार आहे. हे जेवण रेल्वे स्थानकांवर असलेल्या आयआरसीटीसीच्या (भारतीय रेल्वे पर्यटन आणि खानपान सेवा) किचन युनिट्सच्या रिफ्रेशमेंट रूम्स आणि जन आहार्सच्या विस्तारित सेवा काउंटरद्वारे दिले जात आहे.
इकॉनॉमी मील संकल्पना राबवून रेल्वे प्रवाशांना, विशेषतः सामान्य डब्यांमध्ये प्रवास करणाऱ्यांना परवडणारे, दर्जेदार आणि आरोग्यदायी अन्न पुरवेल, असेही रेल्वे विभागाने स्पष्ट केले आहे. हे इकॉनॉमी मील छत्रपती संभाजीनगरसह हैदराबाद, विजयवाडा, गुंटकल आणि रेनिगुंटा रेल्वे स्थानकावरही पुरवले जात आहे. रेल्वे प्रवाशांना दर्जेदार, परवडणारे आणि आरोग्यदायी जेवण देण्यासाठी भारतीय रेल्वेने इकॉनॉमी मील ही संकल्पना मांडली आहे. याचाच एक भाग म्हणून रेल्वे प्रवाशांना, विशेषत: सामान्य डब्यातून प्रवास करणाऱ्यांना रेल्वे प्रवाशांना परवडणाऱ्या दरात दोन प्रकारचे जेवण दिले जाईल.
इकॉनॉमी मीलची किंमत २० रुपये तर कॉम्बो जेवणाची किंमत ५० रुपये मोजावे लागणार आहे. हे जेवण रेल्वे स्थानकांवर असलेल्या आयआरसीटीसी (भारतीय रेल्वे पर्यटन आणि खानपान सेवा) च्या किचन युनिट्सच्या रिफ्रेशमेंट रूम्स आणि जन आहार्सच्या विस्तारित सेवा काउंटरद्वारे दिले जात आहे. प्लॅटफॉर्मवर जनरल डब्याजवळ सेवा काउंटर पुरवले जातील. जेणेकरून मोठ्या संख्येने प्रवाशांना सेवेचा लाभ घेता येईल. अधिकृत विक्रेत्यांद्वारे सेवा काउंटरचा वापर प्रवाशांना जेवण साठवण्यासाठी, पुरवण्यासाठी आणि विक्रीसाठी केला जाईल.
छत्रपती संभाजीनगर येथून सुरुवात
नांदेड विभागाने प्रथमतः छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकात ही सुविधा सुरू केली आहे. सुरुवातीला हे जेवण प्रवाशांना देण्यासाठी दक्षिण-मध्य रेल्वेची पाच स्थानके निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, हैदराबाद, विजयवाडा, रेनिगुंटा आणि गुंटकल रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. या उपक्रमाने झोनमधील सर्व ५ स्थानकांवर यापूर्वीच काम सुरू केले आहे. सामान्य डब्यातून प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना परवडणारे आणि दर्जेदार जेवण पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने हा उपक्रम हाती घेतला आहे. इकॉनॉमी मीलची तरतूद विशेषतः सामान्य प्रवाशांसाठी उपयुक्त ठरेल. प्रवाशांना परवडणाऱ्या दरात दर्जेदार आणि आरोग्यदायी जेवण मिळू शकेल, असे नांदेड रेल्वे विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीती सरकार यांनी सांगितले.