Saturday, May 18, 2024
Homeक्रीडाNPL-2023 : 'देशदूत ब्लास्टर्स'ची उपांत्य फेरीत धडक

NPL-2023 : ‘देशदूत ब्लास्टर्स’ची उपांत्य फेरीत धडक

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सीज वेल्फेअर असोसिएशन (NAAWA) आयोजित ‘नावा प्रिमियर लिग’ (NPL) नावा क्रिकेट सामन्यांना आज पासून महात्मानगर येथील स्टेडियमवर सुरुवात झाली. प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया मधील १२ संघ या स्पर्धेत सहभागी आहे.

- Advertisement -

पहिल्या दिवसाचे दोन्ही सामने जिंकत ‘ब’ गटातून ‘देशदूत ब्लास्टर्स’ने उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. एनपीएलला आज सुरुवात झाली असून पहिला दिवस ‘देशदूत ब्लास्टर्सने’ अक्षरशः गाजवला. फलंदाजांनी तुफान फटकेबाजी केली, तर गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी टीमच्या दांड्या गुल करत उपस्थितांची मने जिंकली. एनपीएल आता रंगतदार वळणावर आली आहे.

सकाळ सत्रात ‘देशदूत’ विरुद्ध ‘सकाळ’ संघ यांचा सामना झाला . सकाळच्या संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना सकाळने ८ षटकांत ५ गडी गमावून ६८ धावा जोडल्या. प्रतिउत्तर देत ‘देशदूत’च्या संघाने ७ गडी राखून अवघ्या ७ षटकांत ७० धावा करत दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात कर्णधार अमोल घावरे यांनी १९ चेंडूत २६ धावा तडकावल्या त्यांना सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

दुसऱ्या सत्रात लोकमत च्या संघा सोबत दोन हात करतांना ‘देशदूत’च्या संघाने ने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. लोकमतने ६ गडी गमावून ८ षटकांत ७८ धावा करत ‘देशदूत’ला ७९ धावांचे लक्ष दिले. अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात ‘देशदूत’च्या संघाने ४ चेंडू शिल्लक राखत ८ गड्यांनी जोरदार विजय मिळवला. या सामन्यात प्रशांत कुटे यांनी २ षटकांत १५ धावा देत ३ गड्यांना तंबूत पाठवले. त्यांना सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.

सामने जिंकल्यानंतर सहकाऱ्यांनी एकच जल्लोष करत मैदान दणाणून टाकले. दोन्ही सामने जिंकल्यानंतर ‘देशदूत ब्लास्टर्स’चे मनोबल वाढले असून, नावा चषक टीम मिळवेल असा विश्वास कर्णधार अमोल घावरे यांनी व्यक्त केला. सामना संपल्यानंतर प्रतिक्रिया देताना ते बोलत होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या