नाशिक | प्रतिनिधी | Nashik
देशातील हरियाणा, दिल्ली, मणिपूर, गुजराथ, राजस्थान, मध्यप्रदेश या राज्यांमध्ये २०१३ पासून सातत्याने वाद निर्माण करुन सत्ता स्थापन करण्याचे काम केले जात आहेत. आज महाराष्ट्रात (Maharashtra) वाद निर्माण केले जात आहे. सामान्यांना दंगली,आंदोलने,जातीय वादांत अडकवण्याचे काम केले जात आहे. नाशिकमध्ये (Nashik) दंगल (Riot) घडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. नागपूरमध्ये घडलेली दंगल हे सर्व त्याच दिशेने चाललेले आहे. शिवसैनिकांनी सावधान होत, हा डाव उधळण्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन शिवसेना उबाठा गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी निर्धार मेळाव्यात केले.
पुढे ते म्हणाले की, “औरंगजेबाची कबर हे आपल्या शौर्याचे प्रतिक राज्यावर चालून येणार्याला असाच गाडला जाईल हे सांगणारी शौर्यगाथा पूसण्याचा प्रयत्न आहे. जातीपातीचे राजकारण (Political) करुन जातीजातीत विष पेरण्याचे काम भाजपा (BJP) करीत आहे. जिल्हा, समाज, जात, पात, मंदिर मस्जिद या भांडणात लोकांना गूंतवून ठेवायचे आपण बेरोजगार राहणार आपला आवाज दाबला जाणार हे प्रकार घडवले जात”, असल्याचेही त्यांनी सांगितले.
आजवर आपल्या मुख्यमंत्र्यांचे पहिले १०० दिवस ‘हनिमून पिरिएड’ म्हटले जात होते. या सरकारच्या काळात पहिल्या १०० दिवसात काय झाले ? एक तरी योजना आली का? या सरकारने शेतकर्यांसाठी,तरुण-तरुणींसाठी एकतरी चांगली योजना आणली आहे का? लाडकी बहीण योजना २१०० सांगून आता ५०० रुपयांवर आणली. आम्ही तर तीन हजार देणार होतो. याला निर्लज्जपणा म्हणतात. याच्यापैकी कोणीतरी न्यायालयात (Court) जाईल आणि न्यायालयातून योजना बंद पाडतील. हे सरकार निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने बसलेले आहे, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली.
बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी समुळ नष्ट केलेल्या गँगवॉरने पून्हा डोके वर काढले आहे. राज्याला मणिपूर करायचा प्रयत्न सूरु आहे. खून, दरोडे, मारामार्या, बालात्कार सारख्या घटना नित्याच्याच झाल्या आहेत. अश्या वातावरणात मोंठ्या गुंतवणूका राज्यात कश्या येतील? आपल्याला पूढच्या २० वर्षांचा विचार करायचा आहे. राज्यात परस्परांत लोप पावत चाललेला संवाद आणायचा आहे. विरोधकांनी कितीही थयथयाट केला तरी आपल्याला प्रवाहाच्या विरुध्द वाहण्याची ताकद आणायची असल्याने त्यासाठी सर्वांनी सज्ज होण्याचे आवाहनही आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी केले.