Tuesday, April 29, 2025
Homeधुळेधुळे : जिल्ह्याची रुग्णसंख्या १ हजार ८५०

धुळे : जिल्ह्याची रुग्णसंख्या १ हजार ८५०

धुळे – Dhule :

जिल्ह्यात कोरोना बाधितांची रूग्ण संख्या वाढत असून आज दिवसभरात तब्बल 51 पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. त्यात धुळे शहरातील 21 तर शिरपूरशहर व तालुक्यातील 19 रूग्णांचा समावेश आहे. जिल्ह्याची एकुण रूग्ण संख्या 1 हजार 850 झाली आहे.

- Advertisement -

दरम्यान तीन कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. त्यात हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल पिंपळनेर (ता. साक्री) येथील 56 वर्षीय पुरुषाचा आज सकाळी मृत्यू झाला. तर खाजगी हॉस्पिटलमध्येकाल रात्री धमाणे (ता.धुळे) येथील 73 वर्षीय वृध्दाचा कोरोनाने मृत्यू झाला. तसेच आज सकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धुळ्यातील वडजाई रोड परिसरातील 48 वर्षीय पुरुष करोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतपर्यंत एकूण 83 रूग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

दुपारी 4 वाजता शिरपूर उपजिल्हा रुग्णालयातील 30 अहवालांपैकी 18 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात सिद्धिविनायक कॉलनी निमझरी नाका 1, भरतसिंग नगर 1, लौकी 1, वाडी 1, तर्‍हाडी 9, भटाने 2, होळनांथे 1, करवंद 1 व शिरपूरातील एका रूग्णाचा समावेश आहे. जिल्हा रुग्णालयातील 16 अहवालांपैकी 2 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. दोघे एसआरपीएफचे जवान आहेत.

महापालिकेच्या पॉलिटेक्निक सीसीसी केंद्रातील 34 अहवालांपैकी 7 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात गल्ली क्र. 4 मधील 3, साईकिरण नगर, मालेगाव रोड 1, विशाल इस्टेट, रेल्वे स्टेशन 1, बडगुजर कॉलनी 1 व वाडीभोकर रोडवरील एक रूग्ण आहे.

तसेच खाजगी लॅब मधील 20 अहवालांपैकी 6 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात 46 वर्षीय पुरूष ग्रीन पार्क धुळे, 56 वर्षीय पुरूष इंदिरा गार्डन परिसर, 29 वर्षीय पुरूष सुशी नगर गोळीबार टेकड़ी, 47 वर्षीय पुरूष गल्ली नं 7 बापु भंडारी गल्ली, 83 वर्षीय महिला बाजार पेठ, बेटावद (ता.शिंदखेडा) व 85 वर्षीय पुरूष उंटावद उमलवड (शिरपुर) या रूग्णांचा समावेश आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : राजूरमध्ये आरोग्य विभाग अलर्ट मोडवर!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अकोले तालुक्यातील राजूर गावात दूषित पाण्यामुळे काविळसह जलजन्य आजारांचा उद्रेक झाला असून या ठिकाणी आरोग्य विभागाकडून 35 पथके तैनात करण्यात आली आहेत....