Saturday, August 22, 2026
Homeक्राईमनर्स सोबत गैरवर्तन करून मारहाण

नर्स सोबत गैरवर्तन करून मारहाण

तरूणाविरूध्द कोतवाली पोलिसात गुन्हा दाखल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहरातील एका हॉस्पिटलमध्ये काम करणार्‍या नर्स सोबत लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून, तिला धमकी देऊन मारहाण केल्याची घटना शहराच्या मध्यवर्ती भागात घडली. या प्रकरणी पीडित नर्सने दिलेल्या फिर्यादीवरून तरूणाविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

योगेश जगदीप सगळगिळे (रा. कोठी, अहिल्यानगर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे. फिर्यादी शहराच्या मध्यवर्ती भागात एका हॉस्पिटलमध्ये काम करतात. योगेश हा त्यांच्यावर नेहमी लक्ष ठेवायचा तसेच माझ्यासोबत बोल असे कायम म्हणायचा. याबाबत त्यांनी पतीला सांगितले होते. फिर्यादीला शनिवारी रात्री ड्यूटी असल्याने त्या हॉस्पिटलमध्ये होत्या.

योगेश हा रात्री दोन वाजेच्या सुमारास हॉस्पिटलच्या गेटवर गेला व फिर्यादीला ‘तू माझ्या बरोबर चल, मला तुझ्याबरोबर बोलायचे आहे, तू जर बाहेर आली नाहीस तर तुला मारून टाकीन’ असे म्हणून तिला मारहाण करून तिचा हात धरून अश्लील वर्तन करून तिचा विनयभंग केला. यावेळी हॉस्पिटलमधील इतर कर्मचारी तेथे आल्याने तो तेथून पळून गेला. दरम्यान, घडलेला प्रकार पीडिताने तिच्या पतीला सांगितला व सोमवारी सायंकाळी या प्रकरणी फिर्याद दिली. पोलीस अंमलदार कवाष्टे अधिक तपास करत आहेत.

ताज्या बातम्या

लिपिक आणि लघुलेखक पदाची फेरपरीक्षा घ्या – जयंत पाटील यांचे उच्च...

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत लिपिक आणि लघुलेखक पदांच्या भरती प्रक्रियेदरम्यान १६ ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या टायपिंग टेस्टमध्ये मोठ्या प्रमाणावर तांत्रिक अडचणी...