Sunday, April 27, 2025
Homeनगरमहिला डॉक्टरकडून नर्सला घरात घुसून मारहाण

महिला डॉक्टरकडून नर्सला घरात घुसून मारहाण

बेलवंडी येथे प्रकार, व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

तालुक्याच्या दृष्टीने महत्वाची बाजारपेठ असलेल्या बेलवंडी गावात एका नामवंत डॉक्टर महिलेने एका नर्सच्या घरात घुसून लोखंडी गजाने मारहाण केल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. मारहाण करतानाचा विडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने नागरिकांनी निषेध व्यक्त केला आहे. डॉक्टर महिलेच्या विरोधात रात्री उशिरा बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत पीडित नर्सने बेलवंडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, नर्स राहत असलेल्या भाड्याच्या घरात रात्री 8 च्या सुमारास संबंधित माहिला डॉक्टर यांनी येऊन ‘माझ्या नवर्‍याच्या मोबाईलवर मॅसेज का करतेस’ असा जाब विचारला त्यावेळी पिडीत महिलेने डॉक्टर महिलेला सांगितले की, ‘माझ्याकडे त्यांचा नंबर नाही. मी कशाला मॅसेज करू‘ असे सांगत असताना तिने हातातील पाईपमध्ये लोखंडी गज टाकून नर्सच्या कपाळावर, डोक्यात, डाव्या हाताच्या मनगटाजवळ, उजव्या पायाच्या गुडघ्यावर, गजाने मारहाण करून तिला जखमी केले. तसेच केस धरून तिला खाली पाडले व गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र तोडले. पुन्हा जर नादी लागली तर तुला फाशी देऊन जीवे मारेन आणि गावात राहिली तर तुला सुपारी देऊन मारून टाकील तसेच तुला कोणत्याही हॉस्पिटलमध्ये काम करू देणार नाही. अशी धमकी दिली.

पीडित महिलेच्या फिर्यादीवरून डॉक्टर महिलेच्या विरोधात बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली जे. जे. बजंगे करीत आहेत. एका डॉक्टर महिलेने थेट लोखंडी गजाने घरात घुसून एका महिलेला मारहाण करणे कितपत योग्य आहे? मारहाण करतानाचा विडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने नागरिकांनी निषेध व्यक्त केला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Accident News : दोन महिलांना पिकअपची धडक, एक जागीच ठार तर...

0
जामखेड । तालुका प्रतिनिधी जामखेड तालुक्यातील खर्डा येथे एक भीषण अपघात घडला. दोन महिलांना भरधाव पिकअपने धडक दिली, ज्यात एक महिला जागीच ठार झाली, तर...