Tuesday, April 8, 2025
Homeब्रेकिंग न्यूजNutrition Fortnight 2025 : आजपासून देशात पोषण पंधरवडा; प्रमुख चार विषयांवर केंद्र...

Nutrition Fortnight 2025 : आजपासून देशात पोषण पंधरवडा; प्रमुख चार विषयांवर केंद्र सरकारचा भर

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

कुपोषणाला तोंड देण्यासाठी सरकारच्या (Government) वचनबद्धतेनुसार महिला आणि बालविकास मंत्रालय (Ministry of Women and Child Development) दि.८ ते २२ एप्रिल २०२५ दरम्यान देशव्यापी सातवा पोषण पंधरवडा (Nutrition Fortnight) साजरा करणार आहे. या वर्षीच्या पोषण पंधरवड्यात प्रमुख चार विषयांवर भर दिला जाणार आहे.

- Advertisement -

बाळ जन्माला आल्यानंतरच्या पहिल्या १,००० दिवसांत आरोग्यविषयक उपायांबाबत लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. पोषण ट्रॅकरचे लाभार्थी/नागरिक मॉड्यूल अधिकाधिक लोकप्रिय कसे होईल, यावर भर दिला जाणार आहे. कुपोषणाचे व्यवस्थापन आणि मुलांमध्ये येणारा लठ्ठपणा दूर करण्यासाठी निरोगी जीवनशैलीचा अंगिकार याकडे ‘सीएमएएम’ लक्ष पुरवणार आहे. पोषण अभियान हा पंतप्रधानांनी सुरू केलेला प्रमुख उपक्रम आहे. यात कुपोषणाशी (Malnutrition) लढण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात.

गर्भवती महिला, स्तनदा माता, किशोरवयीन मुली आणि सहा वर्षांखालील मुलांचे चांगले पोषण व्हावे, यासाठी उपाययोजना राबवल्या जात आहेत. यावर्षीचा पोषण पंधरवडा, आशय, पोहोच आणि फलनिष्पत्ती यासाठी महत्वाचा ठरेल. व्यापक मिशन सक्षम अंगणवाडी आणि पोषण २.० चा भाग म्हणून हा उपक्रम राबवला जाणार आहे. निरामय आरोग्य, रोगाविरुद्ध प्रतिकारशक्ती वाढवणे व कुपोषण कमी करणे लक्ष केंद्रित करणारा हा कार्यक्रम आहे. पोषण पंधरवड्याच्या पहिल्या दिवशी एक विशेष कार्यक्रम होणार आहे.

दरम्यान, याप्रसंगी महिला आणि बाल विकास राज्यमंत्री सावित्री ठाकूर (Minister of State Savitri Thakur) १८ भागीदार मंत्रालयांचे अधिकारी, राज्य महिला आणि बालविकास विभागाचे अधिकारी तसेच सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या अंगणवाडी सेवकांना आज (दि.८ एप्रिल) रोजी वेबकास्टवर दुपारी १२ वाजता संबोधित केले. केंद्रीय महिला आणि बाल विकासमंत्री अन्नपूर्णा देवी पंधरवड्याच्या पहिल्या आठवड्यात अरुणाचल प्रदेशला भेट देतील. राज्यातील महिला आणि मुलांसाठी (Children) मदत अधिक सक्षम करण्यासाठी सुरू असलेल्या उपक्रमांचे त्या मूल्यांकन करतील.

गाव ते जिल्हा स्तरावर कार्यक्रम

यावेळचा पोषण पंधरवडा परिणामाभिमुख असेल. गाव, तालुका आणि जिल्हा पातळीवर गृहभेटी, सामुदायिक पोहोच कार्यक्रम, ओळख मोहीम व शिबिरांमधून तळागाळातील पोषण परिणाम सुधारण्यासाठी विविध भागधारकांना एकत्र आणण्याचे उद्दिष्ट असेल. समुदायाला समग्र पोषणाबद्दल शिक्षित करणे, स्तनपान आणि पूरक आहाराला प्रोत्साहन देणे. तसेच, समुदाय सक्षमीकरण आणि सहभागासाठी एक साधन म्हणून पोषण ट्रॅकरच्या लाभार्थी/नागरिक मॉड्यूलला लोकप्रिय करणे, यावर लक्ष केंद्रित केले जाईल.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

MNS News : मनसेची मान्यता रद्द करण्यासाठी कोर्टात याचिका दाखल

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) राजकीय मान्यता रद्द करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. राज ठाकरे यांच्या...