Thursday, June 20, 2024
Homeनगर68 हजाराचा नायलॉन मांजा जप्त

68 हजाराचा नायलॉन मांजा जप्त

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

दिल्लीगेट (Delhi Gate) परिसरातील सातभाई मळा येथे घराजवळ बोळीत नायलॉन मांजाची (Nylon Manja) विक्री करणार्‍यावर स्थानिक गुन्हे शाखा (LCB), तोफखाना व मनपा पथकाने शनिवारी सायंकाळी संयुक्त कारवाई केली. कारवाई दरम्यान नायलॉन मांजाचे (Nylon Manja) 36 नग, मांजा गुंडाळण्याकरीता लागणारे दोन लाकडी व एक लोखंडी मशीन असा 37 हजार 800 रूपयांचा मुद्देमाल जप्त (Seized) केला आहे.

जिल्ह्यातील ‘या’ गावातील तलाठी कार्यालय गेल्या चार वर्षापासून बंद

पोलीस अंमलदार विनोद मासाळकर यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात (Topkhana Police Station) दिलेल्या फिर्यादीवरून दर्शन दिनेश परदेशी (वय 25 रा. सातभाई मळा, दिल्लीगेट) याच्याविरूध्द गुन्हा दाखल (Filed a Case) केला आहे. शनिवारी पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार संदीप पवार, बापुसाहेब फोलाणे, दत्तात्रय हिंगडे, दिलीप शिंदे, जालिंदर माने, तोफखाना पोलीस ठाण्याचे अंमलदार सुनील शिरसाठ, मनपाचे प्रशांत रामदिन, भरतसिंग सारवान, संदीप चव्हाण, प्रसाद उमाप, अनिकेत उमाप यांचे पथक नायलॉन मांजावर कारवाईसाठी फिरत असताना दिल्लीगेट परिसरात सातभाई मळा येथे एक तरूण घराजवळ बोळीत नायलॉन मांजा (Nylon Manja) विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार एलसीबी, तोफखाना व मनपा पथकाने सातभाई मळ्यात कारवाई करून मांजा जप्त (Seized) केला आहे.

हनीट्रॅप : व्यापार्‍याचे अश्लिल फोटो व व्हिडीओ
काढून मागितली 30 लाखांची खंडणी

दरम्यान भिंगार कॅम्प पोलिसांनी शनिवारी सायंकाळी गाडळकर मळा येथे बांधकाम चालू असलेल्या घरात छापा टाकून 30 हजार रूपये किंमतीचा नायलॉन मांजा जप्त केला. पोलीस अंमलदार राहुल व्दारके यांच्या फिर्यादीवरून पांडूरंग रंगनाथ गाडळकर (वय 48 रा. गाडळकर मळा, सोलापूर रोड, सारसनगर) याच्याविरूध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख, पोलीस उपनिरीक्षक मंगेश बंडकोळी, पोलीस अंमलदार कैलास सोनार, व्दारके, अमोल आव्हाड, अरूण मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

भाच्याच्या निर्णयावर थोरातांनीच बोलावे; काय म्हणाले खा.डॉ.विखे पाटील वाचा…

- Advertisment -

ताज्या बातम्या