Friday, April 25, 2025
HomeनाशिकNylon Manja : नायलाॅन मांजा घातकच - पोलीस आयुक्त कर्णिक

Nylon Manja : नायलाॅन मांजा घातकच – पोलीस आयुक्त कर्णिक

नाशिक पोलिसांतर्फे नागरिकांना नायलॉन मांजा न वापरण्याचे आवाहन

नाशिक । प्रतिनिधी Nashik

मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पतंगबाजीसाठी वापरला जाणारा नायलाॅन व चायनीज मांजा(Nylon Manja) पशुपक्षांसह मीनवी जिवितास धाेकादायक आहे. हा मांजा कुणीही वापरु नये अथवा विक्री करु नये. नाशिककरांनी मांजाविराेधी चळवळीत पाेलिसांना साथ दिली तर हे कृत्रिम संकट आपण लवकरात लवकर थाेपवू असे आवाहन पाेलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दैनिक ‘देशदूत’शी बाेलतांना केले आहे.

- Advertisement -
नाशिक पोलिसांतर्फे नागरिकांना नायलॉन मांजा न वापरण्याचे आवाहन

मकरसंक्रांत १४ जानेवारी रोजी साजरी होत असून शहरात मागील काही दिवसांपासून पतंगबाजी सुरू झाली आहे. ती वाढल्यावर नायलॉन व तत्सम मांजामुळे होणारी जीवितहानी अथवा गंभीर दुखापत रोखण्यासाठी पोलिसांनी कारवाईची धार तीव्र केली आहे. त्यानुसार विविध पाेलीस ठाणे, गुन्हेशाखा पथकांनी केलेल्या धडक कारवाईत ३४ गुन्हे दाखल करुन ३९ जणांना अटक केली आहे. तर मांजा खरेदी व विक्रीसह ताे वापरात आणणाऱ्या जवळपास ७५ संशयितांवर तडिपारीची कारवाई केली आहे. त्यामुळे कधीही हा मांजा वापरु नये किंवा खरेदी करु नये. तसे केल्यास पर्यावरण संरक्षण (Environmental protection)अधिनियमासह भादवि कलम व तडिपारीची कारवाई प्रस्तावित केली जाईल, असे कर्णिक यांनी सांगितले.

विशेष म्हणजे, हा मांजा विक्री करणाऱ्यांसह त्याची खरेदी करणाऱ्यांची माहिती शहर पाेलिसांना द्यावी, संबंधिताचे नाव गाेपनीय ठेऊन संशयितांवर कारवाई केली जाईल, असे शेवटी त्यांनी स्पष्ट केले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...