Monday, September 28, 2026
Homeब्रेकिंग न्यूजयेवल्यात नायलॉन मांजा जप्त; संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात

येवल्यात नायलॉन मांजा जप्त; संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात

येवला | प्रतिनिधी Yeola

- Advertisement -

संक्रांत पतंगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी चोपदार वस्ती येथे छापा घालून तब्बल 104 चकरी नायलॉन मांजा जप्त केला आहे. या प्रकरणी संशयितास ताब्यात घेण्यात आले आहे.

शासनाने नायलॉन मांजावर बंदी घातलेली असून शहरातील चोपदार वस्ती भागात चोरीछुपे पद्धतीने नायलॉन मांजा विकला जात असल्याची माहिती पोलीस हवालदार बोडके आणि वाघमोडे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांचे नेतृत्वाखाली कोर्टा जवळील चोपदार वस्ती येथील एका शेडवर पोलीस व नगरपरिषद पथकाने छापा कारवाई केली. छाप्यात 104 चकरी नायलॉन मांजा मिळून आला. सदर मांजा जप्त करण्यात आला असून या प्रकरणी अझर सलीम शेख उर्फ चोपदार यास ताब्यात घेण्यात आले.

दरम्यान, शहर परिसरात नायलॉन मांजा विक्री वा वापर करणाऱ्यांवर प्रचलित कायद्याने कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक भवारी यांनी सांगितले आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेच्या जनरलच्या 7 जागा बिनविरोध होण्याची शक्यता

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट गडद होत असताना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मात्र राजकीय वातावरण तापण्याआधीच समझोत्याचे सूर उमटू लागले आहेत. रविवारी संगमनेर...