Friday, April 25, 2025
Homeनगरनायलॉन मांजाने तरुणाचा गळा व हात चिरला

नायलॉन मांजाने तरुणाचा गळा व हात चिरला

संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner

पतंगासाठी वापरण्यात येणार्‍या नायलॉन मांजावर (Nylon Manja Ban) बंदी असतानाही सर्रासपणे त्याची विक्री होत असल्याचे उघड झाले आहे. चंदनापुरी येथील युवक दुचाकीवरुन घरी जात असताना या मांजाने गळा व हाताची बोटे चिरल्याचा प्रकार घडला आहे. यामुळे प्रशासनाने सतर्क होवून नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कडक कारवाईची मागणी होत आहे. राज्यात घातक असलेल्या नायलॉन मांजाला बंदी आहे. या मांजामुळे अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. तरी देखील छुप्या पद्धतीने अनेक विक्रेते या मांजाची विक्री करत असल्याचे समोर येत आहे. नवीन वर्षाच्या आगमनापूर्वीच अनेक मुले व तरुण पतंग उडवत आहे.

- Advertisement -

परंतु, नायलॉन मांजा वापरत असल्याने तो अनेकांच्या जीवावर बेतत आहे. चंदनापुरी येथील निलेश रहाणे हा तरुण आपल्या दुचाकीवरुन सायंकाळच्या वेळी घरी चालला होता. दरम्यान, जोर्वे नाका ते अमरधाम परिसरात अचानक नायलॉन मांजाने गळ्याला विळखा घातला. हा विळखा काढत असताना गळ्याबरोबर हाताची दोन बोटे चिरली असून दहा टाके टाकली आहे. त्यामुळे मोठा अनर्थ घडण्यापूर्वीच प्रशासनाने सतर्क होवून शहरातील मांजा विक्रेत्यांची झडती घेऊन कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. याबाबतचे निवेदन स्वतः जखमी निलेश रहाणे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांना दिले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...