Monday, October 28, 2024
Homeभविष्यवेधहे नागराजा आली नागपंचमी; जाणून घेऊया नागपंचमीचे महत्व

हे नागराजा आली नागपंचमी; जाणून घेऊया नागपंचमीचे महत्व

हिंदू धर्मात देवीदेवतांची पूजा-अर्चा करण्यासाठी व्रतवैकल्य आणि सण साजरे करण्यास सुरूवात झाली. तसंच देवदेवतांच्या प्रतीकांची पूजा करण्यासोबतच या दिवशी उपवासही केले जातात. नागपंचमीसुद्धा असंच एक पर्व आहे. नागाला शंकर देवाच्या गळ्यातील हाराचं स्थान आहे. तर साक्षात भगवान विष्णूची शय्या म्हणूनही नागाला स्थान आहे. लोकजीवनातही भारतीयांचं नागांशी पूर्वीपासून दृढ नातं आहे. याच कारणांमुळे नागाची देवता म्हणून पूजा केली जाते. खरंतर आजही भारतातील अधिकांश लोकसंख्याही उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहे. ज्यामुळे भारतात अगदी शेतीच्या अवजारांची पूजा करण्याचीही प्रथा आहे. तर नागाला शेतकर्‍यांचा मित्र म्हणून संबोधलं जातं असल्यामुळेही नागपंचमीची प्रथा आजही प्रचलित आहे. कारण शेतातील उंदरी-घुशी नाग खात असल्यामुळे शेतकर्‍याच्या पिकांचं नुकसान होत नाही. तसंच ही पूजा करण्यामागे धार्मिक आणि सामाजिक कारण तर आहेच, पण भारतीय ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीमधील योगांसोबतच दोष पाहिले जातात. कुंडली दोषांमध्ये कालसर्प दोष हा एक महत्त्वपूर्ण दोष आहे.

कालसर्प दोष अनेक प्रकारचे असतात. त्यांच्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी ज्योतिषी नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करण्यााचे महत्त्व सांगितलं जातं. शास्त्रांनुसार श्रावण मासातील शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीच्या दिवशी नागपंचमी साजरी केली जाते. याशिवाय प्रत्येक महिनाच्या पंचम तिथीला नागदेवतेचं स्थान आहे. परंतु श्रावण मासातील शुक्ल पक्षातील पंचमीला नागदेवतेची पूजा विशेषतः केली जाते. या दिवशी नागांची सुरक्षा करण्याचा संकल्प केला जातो.

हिंदू धर्मात देवीदेवतांची पूजा-अर्चा करण्यासाठी व्रतवैकल्य आणि सण साजरे करण्यास सुरूवात झाली. तसंच देवदेवतांच्या प्रतीकांची पूजा करण्यासोबतच या दिवशी उपवासही केले जातात. नागपंचमीसुद्धा असंच एक पर्व आहे. नागाला शंकर देवाच्या गळ्यातील हाराचं स्थान आहे. तर साक्षात भगवान विष्णूची शय्या म्हणूनही नागाला स्थान आहे. लोकजीवनातही भारतीयांचं नागांशी पूर्वीपासून दृढ नातं आहे. याच कारणांमुळे नागाची देवता म्हणून पूजा केली जाते. खरंतर आजही भारतातील अधिकांश लोकसंख्याही उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहे.

ज्यामुळे भारतात अगदी शेतीच्या अवजारांची पूजा करण्याचीही प्रथा आहे. तर नागाला शेतकर्‍यांचा मित्र म्हणून संबोधलं जातं असल्यामुळेही नागपंचमीची प्रथा आजही प्रचलित आहे. कारण शेतातील उंदरी-घुशी नाग खात असल्यामुळे शेतकर्‍याच्या पिकांचं नुकसान होत नाही. तसंच ही पूजा करण्यामागे धार्मिक आणि सामाजिक कारण तर आहेच, पण भारतीय ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीमधील योगांसोबतच दोष पाहिले जातात. कुंडली दोषांमध्ये कालसर्प दोष हा एक महत्त्वपूर्ण दोष आहे. कालसर्प दोष अनेक प्रकारचे असतात.

त्यांच्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी ज्योतिषी नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करण्यााचे महत्त्व सांगितलं जातं. शास्त्रांनुसार श्रावण मासातील शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीच्या दिवशी नागपंचमी साजरी केली जाते. याशिवाय प्रत्येक महिनाच्या पंचम तिथीला नागदेवतेचं स्थान आहे. परंतु श्रावण मासातील शुक्ल पक्षातील पंचमीला नागदेवतेची पूजा विशेषतः केली जाते. या दिवशी नागांची सुरक्षा करण्याचा संकल्प केला जातो.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या