Saturday, April 26, 2025
Homeमनोरंजन'ओ शेठ' या गाण्यामागचे चेहरे तुम्ही पाहिलेत का?

‘ओ शेठ’ या गाण्यामागचे चेहरे तुम्ही पाहिलेत का?

नाशिक | Nashik

ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट’ या मराठी गाण्याने (Marathi Song) सध्या सर्वांनाच वेड लावलं आहे. व्हाट्सएप स्टेटस (Whatsapp Status), फेसबुक (Facebook) सगळ्या सोशल मीडियावर (Social Media) हेच गाणं वाजत आहे. या तुफान व्हायरल होणाऱ्या गाण्यामागील चेहरे नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) आहेत.

- Advertisement -

या गाण्याच्या गायकाबद्दल अनेकांना माहिती आहे. परंतु याचे लेखक (Lyricist) आणि संगीत दिग्दर्शक (Music Composers) याबद्दल अनेकजण अजून अनभिज्ञ आहेत. हे भन्नाट गाणे उमेश गवळी यांनी गायले आहे. तर हे गीत चांदवड (Chandwad) येथील संध्या केशे (Sandhya Keshe) या मुलीने लिहले असून सहकारी अनिकेत याने ते कम्पोज केले आहे.

हे तुफान व्हायरल झालेलं गीत सध्या व्हाट्सअप, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टाग्राम रील वर धुमाकूळ घालत आहे. लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांच्या होठावर हे गीत सध्या राज्य करत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : २६ एप्रिल २०२५ – मैत्रीतील मंदी परवडणारी नाही

0
मैत्रीचे नाते सर्वांना कायमच भुरळ घालते. तिचे वर्णन करताना साहित्यिकांच्या शब्दांना धुमारे फुटतात. कवींना कविता स्फुरतात. जिवलग मित्रांच्या भेटीच्या अनेक कथा, गोष्टी आणि कविता...