Friday, July 12, 2024
Homeमुख्य बातम्याVideo : माजी खासदार समीर भुजबळ ताब्यात; ओबीसी आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली

Video : माजी खासदार समीर भुजबळ ताब्यात; ओबीसी आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली

पुणे | प्रतिनिधी

- Advertisement -

ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी आज (दि. ३) माजी खासदार समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहरात शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालयावर ओबीसी बांधवाचा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. मात्र, या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.

तसेच माजी खासदार समीर भुजबळ यांच्यासह समता परिषदेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मोर्चाला पुढे जाण्यासाठी पोलिसांकडून मज्जाव केल्याने समीर भुजबळ यांच्यासह ओबीसी बांधवांनी यांनी शनिवारी वाडा परिसरातील रस्त्यावर ठाण मांडत ठिय्या मांडत आंदोलन केले.

यावेळी उठ ओबीसी जागा हो समतेचा धागा हो, जय समता जय संविधान, बोल ओबीसी हल्लाबोल अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.

आंदोलनादरम्यान समीर भुजबळ यांच्यासह ओबीसी बांधवाना पोलिसांकडून अटक करण्यात आली.त्यानंतर त्यांना फरास खाना विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे नेण्यात आले.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा पूर्णपणे पाठींबा आहे. मात्र मराठा समाजाला आरक्षण देतांना ओबीसी आरक्षणाला धक्का लावण्यात येऊ नये. त्यामुळे ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी राज्य सरकारने उच्च व सर्वोच्च न्यायालयात वकील नियुक्त करणे यासह विविध मागण्यासाठी आज आंदोलन करण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या