Friday, November 22, 2024
Homeब्रेकिंग न्यूजLaxman Hake : "मिस्टर संभाजी भोसले, तुम्हाला राजे म्हणणार नाही"; लक्ष्मण हाकेंची...

Laxman Hake : “मिस्टर संभाजी भोसले, तुम्हाला राजे म्हणणार नाही”; लक्ष्मण हाकेंची टीका

जालना | Jalna

राज्यात आरक्षणाच्या (Reservation) मुद्द्यावरुन मराठा-ओबीसी (Maratha-OBC) असा संघर्ष पाहायला मिळत आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा आरक्षणासाठी अंतरवालीत उपोषण सुरु केले आहे. तर दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) आणि नवनाथ वाघमारे हे वडीगोद्री येथे उपोषणास बसले आहेत. अशातच आज अंतरवालीतील उपोषणस्थळी संभाजीराजे छत्रपती यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. या भेटीनंतर संभाजीराजेंनी मनोज जरांगेंची प्रकृती बघवत नाही असे म्हणत सरकारवर निशाणा साधला. तसेच जरांगेंच्या उपोषणस्थळाच्या बाजूला इतरांनी उपोषण करणे चुकीचे आहे असे म्हणत नाव न घेता ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या उपोषणावर टीका केली. त्यानंतर आता संभाजीराजेंच्या या टीकेला हाके यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Maharashtra Weather Update : राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट

ते म्हणाले की, “संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांना शोषितांचा कळवळा नाही. मनोज जरांगे यांचे उपोषण राजकारणासाठीच करण्यात आले होते. मराठवाड्यातील बारा बलुतेदारांच्या दुकानावर हल्ले झाले, नाभिक समाजाच्या लोकांच्या दुकानांवरती हल्ले झाले, हे कशात बसते? संभाजीराजे तुम्हाला राजे म्हणायला लाज वाटते.तुम्ही छत्रपती शिवरायांचे, शाहू महाराजांचे वारस नाही. मनोज जरांगेंना मराठा समाजाचा (Maratha Community) मक्ता दिला आहे का? असे म्हणत मनोज जरांगे पाटील आणि संभाजीराजेंनी औकातीत बोलावं, गादीची माफी मागून सांगतो, रयत तुम्हाला राजे मानत नाही, मी तुम्हाला राजे म्हणणार नाही, मिस्टर संभाजी भोसले म्हणणार”, अशी घणाघाती टीका लक्ष्मण हाके यांनी केली.

देखील वाचा : “NDA मध्ये आल्यास केंद्रीय मंत्रिपद देतो”; प्रकाश आंबेडकरांना ‘या’ नेत्याची मोठी ऑफर

पुढे बोलतांना हाके म्हणाले की, “तुम्ही छत्रपती शिवरायांचे वारस असता तर पहिल्यांदा तुम्ही आमच्या आंदोलनाला भेट दिली असती. राजा हा राजा राणीच्या पोटातून नाही आंबेडकरांच्या संविधानातून (Constitution) जन्माला येतो. यापुढे कोणीही ओबीसी (OBC) जनता तुम्हाला राजे म्हणणार नाही. ओबीसी नेत्यांनाही विनंती आहे. तुम्ही ओबीसींची भाषा बोलणार नसाल तर जनता विचार करतील जे नाराज असतील ते असतील. ओबीसी नेत्यांना विनंती आहे की जो पर्यंत दबावात राहाल तोपर्यंत जरांगे तुमचा पराभव करेल, त्यामुळे उघड पुढे या आणि विश्वास बना” असे आवाहनही लक्ष्मण हाकेंनी यावेळी केले.

देखील वाचा : …तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीतील नेत्याचा निर्वाणीचा इशारा

तसेच “राजा एका जातीचा नसतो, राजा रयतेचा असतो.छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचे राज्य निर्माण होण्यासाठी अठरापगड जातींनी जीवाची कुर्बानी दिली. मात्र, तुम्ही विशाळ गडावरती माझ्या मुस्लिम माता-माऊली लढत होत्या, तेव्हा हात वर करून चिथावणी देत होता. त्या जरांगेंनी त्याच्या बॅनरवर छत्रपती शाहू महाराजांची प्रतिमा वापरली आहे का? असा सवाल करत आम्ही एका जातीची मागणी करत नाही”, असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या