मुंबई | Mumbai
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मद्यधुंद अवस्थेत शिवीगाळ केल्याचा आरोप मराठा तरुणांनी केला आहे. पुण्यातील कोंढवा भागातून एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये लक्ष्मण हाके आणि मराठा तरुण यांच्यामध्ये वाद सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. यादरम्यान जोरदार घोषणाबाजी सुरू होती. लक्ष्मण हाकेंचे मेडिकल चेकअप करण्याची मागणीही मराठा तरुणांनी केली होती. अखेर या प्रकरणात आता मोठी बातमी समोर आली आहे. लक्ष्मण हाके यांची ससुन रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे.
वैद्यकिय चाचणीचा अहवाल काय आहे?
लक्ष्मण हाके यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. दरम्यान लक्ष्मण हाके यांनी मद्यप्राशन केल नसल्याचे निष्कर्ष निघाला आहे. लक्ष्मण हाके यांची ससून रुग्णालयात वैद्यकिय चाचणी करण्यात आली होती. प्राथमिक अहवालात त्यांनी दारु प्यालेली नव्हती असा निष्कर्ष डॉक्टरांनी काढलाय. त्यानंतर आणखी खात्री करण्यासाठी लक्ष्मण हाके यांच्या रक्ताचे नमुने चाचणीसाठी वैद्यकिय प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आलेत. त्यांचा अहवाल येण्यासाठी आणखी एक दोन दिवस लागू शकतात. . दरम्यान लक्ष्मण हाके हे राञीच नागपुरला रवाना झाले असून, ते आज काल घडलेल्या प्रकाराबाबत पत्रकार परिषद घेणार आहेत. तसेच त्यांची आज नागपुरात नियोजन सभा देखील आहे.
काय म्हणाले लक्ष्मण हाके?
“हा लक्ष्मण हाकेला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. यांच्या बुद्धीची मला कीव करावीशी वाटते. अरे, भेकडांनो 5-25 काय आडवे येता? एकट्याला गाठलं तुम्ही. लक्ष्मण हाके होळकरांची औलाद आहे. समोरासमोर युद्ध करणारा लक्ष्मण हाके आहे. तुमच्यात धमक आहे ना वेळ सांगून या. खरं तर ही चेतावनी समजा. लक्ष्मण हाके आजपर्यंत संविधान, कायदा आणि घटनेची भाषा बोलत आला. मात्र तुम्ही लक्ष्य करण्याचा, बदनाम करण्याचा प्रयत्न करताय. अजिबात लक्ष्मण हाके घाबरणार नाही,” असे लक्ष्मण हाकेंनी म्हटले आहे. तसेच, “चार ते पाच दिवस मी सलाईनवर आहे. माझी औषधे सुरु आहेत,” असेही लक्ष्मण हाकेंनी सांगितले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा