Sunday, June 14, 2026
HomeनाशिकNashik News : आमच्या लढ्याला यश, सर्व अडथळे झाले दूर

Nashik News : आमच्या लढ्याला यश, सर्व अडथळे झाले दूर

ओबीसी आरक्षणासंदर्भातील न्यायालयाच्या निर्णयावर भुजबाळांची प्रतिक्रिया

नाशिक | Nashik

ओबीसी आरक्षणा (OBC Reservation) संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला महत्वपूर्ण निर्णय म्हणजे आमच्या लढ्याला यश आले असून आता सर्व अडथळे दूर झाले आहे. अशी प्रतिक्रिया ओबीसी नेते तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Food and Civil Supplies Minister Chhagan Bhujbal) यांनी दिली आहे. 

- Advertisement -

ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने  महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. महाराष्ट्रातील २७ टक्के ओबीसी आरक्षणाला (OBC Reservation) आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. या याचिकेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये २७ टक्के ओबीसी आरक्षणाला विरोध करण्यात आला होता. त्यानंतर आज न्यायालयाने आरक्षणासह निवडणुका घेण्यास परवानगी दिली आहे. यामुळे राज्यात २७ टक्के आरक्षणासह निवडणुका होणार आहेत. दोन याचिका  सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत.

प्रभाग रचना आणि ओबीसी आरक्षण संदर्भातील याचिका फेटाळल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयात अनेकजण गेले होते. ओबीसी संख्या माहीत नाही त्यामुळे  आव्हान देण्यात आले होते. देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांचे सरकार आले होते . मात्र, कोरोना असल्यामुळे जणगणना शक्य नव्हती. जणगणना नाही त्यामुळे अंपेरिकल डेटा नव्हता, असे मत मंत्री छगन भुजबळ (Food and Civil Supplies Minister Chhagan Bhujbal) यांनी व्यक्त केले.

ताज्या बातम्या

Nashik Vidhan Parishad Election : महायुतीची ‘सेफ हाऊस’ पॉलिटिक्स; शिवसेनेनंतर भाजपचेही...

0
नाशिक | Nashik स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीच्या (Nashik Vidhan Parishad Election) पार्श्वभूमीवर महायुतीने (Mahayuti) आपल्या नगरसेवकांना एकत्र ठेवण्याची रणनीती आखली आहे. शिवसेनेचे (शिंदे...