बारामती | Baramati
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात बारामती येथे आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात येणार होताच, या मोर्चाला हजारो ओबीसी बांधव उपस्थित आहेत. मात्र, बकरी ईद आणि गणपतीचे कारण देत, बारामती मधील ओबीसी मोर्चाची परवानगी प्रशासनाने नाकारली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनास बारामतीमधूनच रसद पुरविण्यात आल्याचा आरोप करत हाकेंनी आपला मोर्चा बारामतीकडे वळवला आहे. मात्र, पोलिसांनी हाकेंच्या मोर्चाला परवानगी नाकारली असून मला अटक करा, तुरुंगात टाका, असे म्हणत हाकेंनी बारामतीत जाणारच असल्याचे म्हटले.
आम्ही कधीही मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, अलीकडच्या काळात लोकं हक्कावर बोलायला तयार नाहीत. आपण कारखानदार यांच्या विरोधात बोलतोय, बेकायदा मागणीच्या विरोधात बोलत आहोत. खासदार सुप्रिया सुळे, अजित पवार आम्ही तुम्हाला मत दिले नाही का? सरकारने आताचा जो जीआर काढला आहे, त्याने फक्त ओबीसी नाहीतर एसी आणि एसटी यांचेदेखील आरक्षण संपत आहे. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे तत्त्व यांनी जपले आहे. घराणेशाही संविधानाला अपेक्षित आहे, शेवटच्या घटकापर्यंत पोहोचले पाहिजे. चव्हाण साहेब तुम्ही आज माझा सत्कार केला, तुम्ही दाखवून दिलेला आहे की महाराष्ट्र एक आहे.
आरक्षण गेलं तर गाव गाड्यातील बलुतेदार काय करेल, छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र 18 पगड जातीचा आहे. बारामतीला जायचं आहे, रॅलीने जायचंय, उशीर झालाय, असे म्हणत लक्ष्मण हाके यांनी बारामतीकडे आपला मोर्चा वळवला आहे. मात्र, बारामतीतील नियोजित ओबीसी मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. तर, अटक झाली तरी आम्ही बारामतीत जाणार, पोलीस असे का वागत आहेत? मुंबईपेक्षा बारामतीतला गणपती मोठा नाही, असे म्हणत लक्ष्मण हाके बारामतीमधील ओबीसी मार्चावर ठाम आहेत. तसेच, गोळ्या जरी घातल्या तरी आपण मोर्चावर ठाम आहोत, अस म्हणत हाके यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




