Saturday, July 27, 2024
Homeनगरओबीसी संरक्षण हटले तर तुम्ही जबाबदार

ओबीसी संरक्षण हटले तर तुम्ही जबाबदार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

ओबीसींना (OBC) मिळणार्‍या घटनात्मक लाभाचे संरक्षण (Protection) करण्याची जबाबदारी भारतीय प्रशासन सेवेतील (आयएएस) अधिकार्‍यांवर अधिक आहे. त्यामुळे त्यांनी हे भान ठेवले नाहीतर ओबीसी समाजातील (OBC Society) असंतोष वाढीला राज्याच्या नेतृत्वाबरोबरच हे अधिकारीही जबाबदार असतील, असा इशारा नगरमधील 22 ओबीसी संघटनांनी (OBC Society) सोमवारी दिला. मराठा समाजाला (Maratha Society) आरक्षण देण्यासाठी आमचा विरोध नाही. परंतु ओबीसी आरक्षणाला (OBC Society) धक्का लावू नये, अशी मागणीही या संघटनांनी केली आहे.

- Advertisement -

गणेशोत्सवानंतर जिल्ह्यातील 195 ग्रा.पं.च्या निवडणुकीचा बार?

ओबीसी आरक्षण बचाव कृती समितीने जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ (Collector Siddharam Salimath) यांना निवेदन दिले. महाराष्ट्र शासनाला मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेत अडचणी येत आहेत व त्यामुळे त्यात सुसूत्रता आणण्याच्या उद्देशाने समिती स्थापन केल्याचे दिसून येत आहे. यावरून असे स्पष्ट होते की, सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र (Kunbi Certificate) देण्याचा घाट महाराष्ट्र सरकारने घातलेला आहे. त्यामुळे असा निर्णय घेतला तर आमरण उपोषणाचा इशारा (Hint) यावेळी या संघटनांनी दिला.

बबनराव घोलप यांचे शक्तीप्रदर्शन

यावेळी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, समता परिषदेचे अंबादास गारुडकर, दत्ता जाधव, ओबीसी व्हि.जे.एन टी जनमोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, प्रा. माणिक विधाते, राजेंद्र पडोळे, मुस्लिम समाजाचे नेते शौकत तांबोळी, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुभाष लोंढे, दीपक खेडकर, अनिल निकम, नितीन भुतारे, अनिल इवळे, भाऊसाहेब कोल्हे, नईम शेख, अमित खामकर, सचिन गुलदगड, गणेश बनकर, संजय लोंढे, डॉ.परवेज शफी, भाऊसाहेब कोल्हे, बाबा सानप, अनिल इवळे, शौकत तांबोळी, रमेश सानप, परेश लोखंडे, माऊली गायकवाड, नेत्रदूत जालिंदर बोरुडे, निलेश चिपाडे, नाभिक समाजाचे शांताराम राऊत, बाळासाहेब भुजबळ, संजय शिंदे, संजय सागावकर, विक्रम पाठक, जनार्दन वाघ, रोहित पटारे, अमोल खाडे, राहुल रासकर, सुनील भिंगारे, सौ.मंगल भुजबळ, छाया नवले, सुनील भिंगारे, प्रकाश इवळे, रेखाताई विधाते, रेणुका पुंड, स्वाती सुडके आदींसह ओबीसी समाज बांधव उपस्थित होते.

धनगर समाज आक्रमक, आजपासून तीव्र आंदोलन

ओबीसीवरील अन्याय दूर करण्यासाठी व खरे ओबीसी वंचित राहू नयेत म्हणून सरकारने ओबीसींना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. याव्यतिरिक्त मराठा समाजाच्या ओबीसीकरणाचा प्रयत्न झाला तर भारतीय संविधानाच्या सामाजिक न्यायाच्या तत्वालाच हरताळ फासला जाईल आणि त्यामुळे महाराष्ट्रातील ओबीसी प्रवर्गात समाविष्ट असणार्‍या मागासलेल्या बारा बलुतेदार, भटक्या, विमुक्त-जाती-जमातीमध्ये प्रचंड असंतोष पसरेल. या तीव्र असंतोषातून राज्यात व देशात प्रचंड संघर्ष उभा होईल व त्यास संपूर्णपणे राज्य सरकार जबाबदार राहील, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.

अल्पवयीन मुलीला पळवून नेत अत्याचार

तर, सरकारवर खटला

सुप्रीम कोर्टाने 5 मे 2021 रोजी मराठा समाजाला दिलेले आरक्षण रद्द केले आहे. संपूर्ण मराठा जातीला आरक्षण नाकारले आहे. तसेच याबाबतीत कुठलीही अपवादात्मक परिस्थिती नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले होते. तरीही सरकार मराठवाड्यातील मराठा समाजाला ओढूनताणून ओबीसी बनवत आहे. हा कोर्टाचा अवमान आहे. त्यामुळे तो अध्यादेश तात्काळ रद्द करावा. अन्यथा सरकारवर कोर्टाचा अवमान केल्याचा खटला दाखल करण्यात येईल.असा इशारा ओबीसी संघटनांनी दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या