Wednesday, June 19, 2024
Homeक्राईमKarnataka Sex Tape: प्रज्वल रेवण्णाला अटक होताच न्यायालायची मोठी कारवाई

Karnataka Sex Tape: प्रज्वल रेवण्णाला अटक होताच न्यायालायची मोठी कारवाई

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
कर्नाटकासह देशभरात खळबळ माजवणाऱ्या सेक्स स्कँडलप्रकरणी एसआयटी पथकाने जेडीसएसचे निलंबित नेते प्रज्ज्वल रेवण्णा याला अखेर अटक केली आहे. एसआयटी पथकाने बंगळुरू विमानतळावरून त्याला ताब्यात घेतले.

- Advertisement -

कर्नाटक पोलिसांनी बंगळुरु विमानतळावर पोहोचताच प्रज्वल रेवण्णाला अटक केली. बंगळुरुच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रज्वल रेवण्णा पोहोचताच त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली. प्रज्वल रेवण्णा भारतात येणार अशी माहिती इंटरपोलने एसआयटी पथकाला दिली होती.

त्यानुसार, पथकाने बंगळुरू विमानतळावर अटकेची पुर्व तयारी करुन ठेवली होती. शुक्रवारी म्हणजेच ३१ मे रोजी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास प्रज्जवल रेवण्णाचे विमान बंगळुरूत विमानतळावर दाखल झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. तसेच आज शुक्रवारी एसआयटी पथकाने त्याला आजच न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या