ओझे | Oze
एकीकडे पाऊस, वातावरणातील बदल, तर दुसरीकडे करोनाचे संकट यामुळे द्राक्ष उत्पादकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
दिंडोरी तालुक्यातील द्राक्षे पंढरी ला गेल्या तीन ते चार वर्षांपासून वेगवेगळ्या स्वरूपाच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. कधी अव्वाच्या सव्वा पाऊस, तर कधी वातावरणातील बदल किंवा भांडवलासाठी वणवण भटकंती इ.समस्या नेहमी शेतकरी वर्गाला ञास देत असतात.
तरी ही पण या समस्या बाजुला सारून शेतकऱ्यांनी थोड्या फार प्रमाणात ऑक्टोबर छाटणीला सुरुवात केली आहे.
यंदा पावसाचा लपंडाव सुरू असल्याने पिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी वेळोवेळी औषधांची फवारणी करावी लागत आहे. करोनामुळे मजूर वर्ग मिळेनासा झाला असून ऑक्टोबर छाटणीसाठी शेतकरी वर्गाची मोठी धावपळ सुरू झाली आहे. परिणामी अधिक मजुरी देऊन मजुरांना आणावे लागत आहे.
यंदा द्राक्षे हंगाम घेण्यासाठी तारे वरची कसरत करावी लागत आहे. कारण मागील हंगाम करोना मुळे वाया गेला. तसेच यंदा अनेक पिकांना पावसाचा फटका बसल्याने या हंगामात भांडवल कसे निर्माण करायचे ही समस्या उभी राहिली आहे.
– चंद्रकांत गायकवाड, द्राक्षबागायतदार