मुंबई | Mumbai
भारतात येत्या ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर महिन्यामध्ये आयसीसी वनडे क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धा (ODI WC 2023) होणार आहे. आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेचे ५ वेळा विजेतेपद पटकावणारा ऑस्ट्रेलिया (Australia) क्रिकेट संघ आपल्या खेळाडूंना झालेल्या दुखापतीमुळे त्रस्त झाला आहे…
सध्या ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आला आहे. ५ सामन्यांची एकदिवसीय मालिका दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. या मालिकेतून नियमित कर्णधार पेट कमिन्स, मिचेल स्टार्क, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल दुखापतीमुळे बाहेर पडले आहेत. आता ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा डावखुरा सलामीवीर फलंदाज ट्रेवीस हेडची भर पडली आहे. त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे.
Marathwada Cabinet Meeting: मराठवाड्याला 59 हजार कोटींचे पॅकेज, CM एकनाथ शिंदेंची घोषणा
दक्षिण आफ्रिका विरुद्ध सेंच्युरीअन येथे झालेल्या सामन्यात त्याला दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा गोलंदाज गेरालड कोएटझीचा चेंडू लागला होता. त्याच्या हाताला फ्रॅक्चर झाल्याची माहिती मिळत आहे.
ही माहिती ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांनी दिली आहे. आज शनिवारी त्याच्यावर स्कॅन करण्यात येणार असून, योग्य तो निर्णय घेण्यात येईल. हेडला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली तर बदली खेळाडू म्हणून टीम डेव्हिड किंवा मारनस लबुशेनला संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.
सलिल परांजपे, नाशिक.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
उद्धव ठाकरेंनी मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाचा खून केला, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल