Tuesday, January 27, 2026
HomeनगरCrime News : ओडिशातून आलेला गांजा जप्त; 81 लाखांचा मुद्देमाल ताब्यात

Crime News : ओडिशातून आलेला गांजा जप्त; 81 लाखांचा मुद्देमाल ताब्यात

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई || दोन इसम जेरबंद

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्ह्यातील अंमली पदार्थ तस्करीविरोधात राबविलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ओडिशा राज्यातून विक्रीसाठी आणलेला 30 लाख 22 हजार 625 रूपये किंमतीचा तब्बल 120 किलो 905 ग्रॅम वजनाचा गांजा आणि इतर साहित्य असा मिळून 80 लाख 83 हजार 464 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी दोन इसमांना अटक करण्यात आली असून, गांजा तस्करीमागे मोठे रॅकेट असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisement -

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिलेल्या विशेष आदेशानुसार अंमली पदार्थविरोधी मोहिमेअंतर्गत पथकांना हालचाली सुरु होत्या. 29 ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कबाडी यांना गुप्त माहिती मिळाली, ओडिशातून आणलेला गांजा एका ट्रकद्वारे श्रीगोंदा तालुक्यातील नवनाथ अंबादास मेटे व त्याचा साथीदार विक्रीसाठी घेऊन येत आहेत. त्यानुसार शेंडी बायपास- एमआयडीसी रोडवर वडगाव गुप्ता शिवारातील हॉटेल किनाराजवळ सापळा रचण्यात आला. पोलिसांनी संशयित ट्रक (क्र. एमएच 14 जीयू 2111) थांबवला असता, त्यामध्ये दोघेजण आढळले. त्यांची नावे नवनाथ अंबादास मेटे (38, रा. ढोरजे, ता. श्रीगोंदा) व ज्ञानेश्वर दत्तात्रय फुंदे (31, रा. मळेगाव, ता. शेवगाव) अशी असल्याचे समोर आले.

YouTube video player

फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने ट्रकची झडती घेतली असता, केबिनवरील टपावर ठेवलेल्या सहा गोण्यांतून 120 किलो 905 ग्रॅम गांजा सापडला. त्याची बाजारभावानुसार किंमत 30 लाख 22 हजार 625 रुपये एवढी असून, ट्रक, त्यामध्ये आढळून आलेले लोखंडी पाईप, संशयित आरोपीकडील मोबाईल असा जप्त मुद्देमालासह एकूण किंमत 80 लाख 83 हजार 464 रुपये इतकी होते. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार प्रकाश नवनाथ मांडगे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हादाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोउपनि. अनंत सालगुडे करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक कबाडी व स्थानिक गुन्हे शाखेतील उपनिरीक्षक अनंत सालगुडे व राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार अतुल लोटके, गणेश लोंढे, संतोष खैरे, दिपक घाटकर, फुरकान शेख लक्ष्मण खोकले, राहुल द्वारके, अमृत आढाव, आकाश काळे, रमिझराजा आतार, प्रकाश मांडगे, सागर ससाणे, भगवान धुळे, उमाकांत गावडे, अरुण मोरे, जयराम जंगले यांच्या पथकाने केली आहे.

अजून साथीदारांचा शोध
ओडिशा राज्यातून थेट जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गांजा आणला जात असल्याने तस्करीचे आंतरराज्यीय जाळे सक्रिय असल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी कोतवाली पोलिसांनी केलेल्या कारवाईत ओडिशा राज्यातून आणलेला गांजा पकडला होता. दरम्यान प्राथमिक चौकशीत दोन्ही संशयित आरोपींनी सदर गांजा त्यांच्या इतर साथीदारांचा असल्याचे सांगितले. त्यामुळे तस्करीचे जाळे किती व्यापक आहे, याचा तपास सुरू असून, अजून संशयित आरोपींचा शोध सुरू आहे. यामध्ये आणखी दोन संशयित असून ते पुणे जिल्ह्यातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ताज्या बातम्या

ॲट्रॉसिटी

Girish Mahajan: मी दिलगीरी व्यक्त केली, मग एवढे कशासाठी? ॲट्रॉसिटी दाखल...

0
मुंबई | Mumbaiनाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याने मंत्री आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहे....