प्रेमेंद्र पाटील
नवापूर । Nawapur
येथील उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक ट्रामा केअर सेंटर (Trauma Care Center) तयार होऊन बराच कालावधी लोटल्यानंतर 9 फेब्रुवारीला उद्घाटन झाले. मात्र, उद्घाटन होवून दोन महिन्यांचा कालावधी लोटला तरीही वैद्यकीय अधिकारी (Medical officers) व आवश्यक कर्मचारी नसल्याने ट्रामा केअर सेंटर सेवा देण्यास असमर्थ आहे. आरोग्य सेवा देण्यासाठी शासनाने करोडो रुपये खर्च केले मात्र प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे इमारतीचे आरोग्यच धोक्यात आले असून इमारत धुळखात (dust lying down) पडली आहे.
जवानांचे बलिदान निवडणुका जिंकण्यासाठी घेतले का?
राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या हस्ते 9 फेब्रुवारीला नवापूर उपजिल्हा रुग्णालयातील ट्रामा केअर सेंटरचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित, खा.डॉ.हिना गावित, आ.आमश्या पाडवी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.चारुदत्त शिंदे यांच्यासह राजकीय व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्ह्याच्या विकासासाठी शासन कटीबद्ध असून केंद्र व राज्यसरकारच्या सहकार्याने नागरिकांना दळणवळणासाठी चांगले रस्ते निर्माण होत आहेत. नवापूर शहर राष्ट्रीय महामार्गावर असल्याने अपघात झाल्यास जखमींना व परिसरातील नागरिकांना तातडीने उपचार मिळण्यासाठी या ट्रामा केअर सेंटरचा उपयोग होवून भविष्यात अनेक अपघातग्रस्तांचे जीव वाचू शकणार आहेत.
मे महिन्याआधीच जिल्ह्यात टँकरने पाणीपुरवठा!वाघळी येथे दुचाकीच्या धडकेत वृध्द महिला ठार
संपूर्ण महाराष्ट्रात रस्ते, दळणवळणाच्या सुविधा निर्माण झाल्यात मात्र मोठ्या संख्येने अपघातही व्हायला लागले. अपघाताचे प्रमाण पाहता सरकारने एक आराखडा तयार केला. ट्रामा केअर सेंटर कुठे कुठे उभे केले पाहिजे यासाठी स्थापन झालेल्या समितीने नवापूर येथे ट्रामा सेंटर उभारण्याचे ठरविण्यात आले. जिल्ह्यातील पहिली आधुनिक अशी सुसज्ज इमारत उभी राहिली असून या सेंटरचा नागरिकांना लाभ होणार आहे. मात्र सदर इमारतीचे उद्घाटन होवून दोन महिने झाले तरी आरोग्य सेवा सुरू नाही. सेंटर वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रतिक्षेत आहे.
कोरोनाकाळातही नवापूर येथे आवश्यक बेड उपलब्ध नव्हते. त्यावेळी ट्रामा केअर सेंटर इमारतीचा उपयोग पर्यायी व्यवस्था म्हणून करण्यात आला होता. राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत वेगात सुरु असून पुढच्या दोन तीन महिन्यात हा महामार्ग सुरु होईल. चांगले रस्ते तयार झाले तर वाहनांचा वेगही वाढतो. त्यामुळे अशा वाहनांचा अपघातही होतो. त्यावेळी एखाद्या अपघातग्रस्त रुग्णला अत्याधुनिक ट्रामा केअर सेंटरचा उपयोग होईल. याठिकाणी तज्ञ डॉक्टर उपलब्ध होणे आवश्यक आहे.
दहिगाव प्रतिमा विटंबन प्रकरण: आरोपपत्र दाखल होईस्तोवर संशयितांना गाव बंदी राजस्थानची नंदिनी गुप्ता ठरली ‘ फेमिना मिस इंडिया’ रावेर बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅनलची घोषणा
असे आहे ट्रामा केअर सेंटर
राष्ट्रीय महामार्गावर होणारे अपघात आणि त्यात जखमी होणार्या रुग्णांना तसेच स्थानिक रुग्णांना तत्काळ अत्यावश्यक वैद्यकिय सेवा उपलब्ध होण्यासाठी नवापूर उपजिल्हा रुग्णालय परिसरात अत्याधुनिक वैद्यकिय उपकरणांसह ट्रामा केअर सेंटर उभारण्यात आले आहे. या रुग्णालयात 20 खाटांची सुविधा उपलब्ध आहे. याठिकाणी अपघात विभाग, एक्स-रे विभाग, सोनाग्राफी विभाग, आय.सी.यु विभाग, ऑपरेशन थेअटर अशा प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहे. या रुग्णालयात अस्थिरोग तंज्ञ, बधीरीकरण तज्ञ, अपघात वैद्यकीय अधिकारी तसेच इतर आरोग्य कर्मचारी असे एकूण 15 अधिकारी कर्मचार्यांची पदे मंजूर आहेत.
रावेर बाजार समितीत भाजप-शिंदे गटाचेही पॅनल घोषितगुंगीचे औषध देत अल्पवयीन मुलीवर बलात्कार
आवश्यक वैद्यकीय अधिकारी यांची पदे रिक्त असल्याने पूर्ण क्षमतेने ट्रामा केअर सेंटर सुरु नाही.
-डॉ.चारुदत्त शिंदे जिल्हा शल्यचिकित्सक नंदुरबार
मस्कावद येथे शाॅकसर्किटमुळे गुरांच्या गोठ्याला आग