Wednesday, March 26, 2025
Homeक्राईमआक्षेपार्ह पोस्ट; एकावर गुन्हा दाखल

आक्षेपार्ह पोस्ट; एकावर गुन्हा दाखल

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

प्रभु श्रीराम यांच्या बद्दल व्हाट्स अ‍ॅप ग्रुपवर मेसेज टाकून हिंदु धर्मीयांच्या भावना दुखावण्यात आल्याची घटना राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी येथे 24 मे रोजी घडली आहे. या घटनेमुळे तांदूळवाडी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत एका जणाच्या विरोधात राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी येथील नागरिकांच्या एका व्हाट्सप ग्रुपमध्ये अनेक जाती धर्माचे लोक आहेत. 24 मे रोजी रात्री 9.45 वाजे दरम्यान सुविचार या ग्रुपवर आरोपीने एका बातमीच्या व्हिडिओखाली अखेर डाव साधलाच. केंद्रा पाठोपाठ आता महाराष्ट्रातही खाजगीकरण केले. रद्द केलेला जीआर पुन्हा काढण्यात आला आहे. आरक्षण संपवण्यात आले. राम मंदिर, मराठा आरक्षण आंदोलन चालू असताना संपुर्ण खासगीकरण करून टाकले आहे. व त्याखाली प्रभु श्रीरामाबद्दल आक्षेपार्ह मजकूर असलेली पोस्ट टाकली. आरोपीने केलेल्या सदर पोस्टमुळे या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये असलेल्या हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या गेल्या.

या घटनेमुळे तांदुळवाडी परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेचा निषेध व्यक्त करत अनेक तरुणांनी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपीवर फिर्याद दाखल करण्याची मागणी केली. याप्रकरणी अमोल चंद्रभान पेरणे (वय 33) रा. तांदुळवाडी या तरुणाच्या फिर्यादीवरून आयुब लालखान पठाण रा. तांदुळवाडी याच्यावर गु.र.नं. 615/2024 भादंवि कलम 295 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे हे करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Rahuri : राहुरीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना

0
राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri राहुरी (Rahuri) शहरातील श्री बुवासिंद बाबा तालीम येथे आज (बुधवार) दुपारच्या सुमारास अज्ञात इसमाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना (Chhatrapati Shivaji...