Saturday, May 25, 2024
Homeमुख्य बातम्याशरद पवारांना ऑफर देण्याबद्दल राष्ट्रवादी नेत्याचे वडेट्टीवारांना उत्तर; म्हणाले...

शरद पवारांना ऑफर देण्याबद्दल राष्ट्रवादी नेत्याचे वडेट्टीवारांना उत्तर; म्हणाले…

मुंबई | Mumbai

मागील दोन दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) काय भूमिका घेणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. त्यातच काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाकडून (Uddhav Thackeray Group) तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. तसेच शरद पवार यांना केंद्रीयमंत्री पदाची ऑफर (Offer Of Central Ministry to Sharad Pawar) देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. यावर शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -

विजय वडेट्टीवार काय म्हणाले याच्यावरती मी स्पष्टीकरण द्यावे, हे हास्यास्पद होईल. पण शरद पवारांना कोण ऑफर देऊ शकतो हे म्हणजे या वर्षातील सर्वात मोठा जोक आहे!, असे राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते जितेंद्र आव्हाड म्हणालेत. त्यांची उंची किती. त्यांची लोकसभेतील कारकीर्द किती आणि त्यांना कोण ऑफर देणार, जे कोणी काय बोलतात ते बोलू देत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विरोधकांवर टिका; म्हणाले गेल्या एक वर्षापासून…

जे कोणी काय बोलतात ते बोलू द्या. पवार साहेबांनी सांगोल्याच्या पत्रकार परिषदेत स्पष्टपणे सांगितले आहे की, मी कुठेही जाणार नाही. मी जातीयवादी पक्षाची हातमिळवणी करणार नाही. मी पुरोगामी विचारांचा पुरस्कर्ता आहे. मी तेच विचार पुढे घेऊन जाणार आहे, असे त्यांनी म्हटल्याचे आव्हाड यांनी स्पष्ट केले आहे.

काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी अजित पवार शरद पवार भेटीवर भाष्य केले. शरद पवार हे सोबत आले तरच तुम्हाला मुख्यमंत्री करू अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अट असावी. त्यामुळेच अजित पवार शरद पवार यांची भेट घेत असावेत, असे विजय वडेट्टीवार म्हणालेत. त्याला जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिले आहे.

Ajit Pawar : “… तरच भाजपा अजित पवारांना मुख्यमंत्री बनवेल”; विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा

दरम्यान राष्ट्रवादीच्या मागेपुढे संभ्रम निर्माण करायचा आहे, हाच एक उद्देश आहे. शरद पवार यांच्या विचारधारेत फरक पडलेला नाही. ते पुरोगामी विचार घेऊनच चाललेत यापुढे पुरोगामी विचार घेऊनच चालतील, असा दावाही आव्हाड यांनी केला.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या