नाशिक | Nashik
संपूर्ण सातपूर, गंगापूर, शिवाजीनगर परिसर हा भाजपचाच (BJP) बालेकिल्ला असून येत्या २३ तारखेला यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब होईल, असे प्रतिपादन या परिसरातील भाजप महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केले. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार आ. सीमा महेश हिरे (Seema Hiray) यांच्या प्रचारार्थ या भागातील प्रभाग क्रमांक १० व ११ मध्ये रविवारी काढलेल्या प्रचार रॅलीवेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना वरीलप्रमाणे दावा केला.
हे देखील वाचा : Nashik Political : मतदार प्रा. फरांदे यांना मंत्रिपदी पोहोचवणार; माजी नगरसेवक संजय बागूल यांचा विश्वास
खान्देश मराठा मंडळाचे सातपूर अध्यक्ष राजू पाटील, भाजपा मंडलाचे अध्यक्ष भगवान काकड, माधुरी बोलकर,जीवन रायते, राजेश दराडे, भावना पवार आदींनी रॅलीच्या सुरुवातीस मनोगत व्यक्त करून, सीमा हिरे यांना मोठे मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला. सातपूर परिसरात (Satpur Area) शांतता नांदवायची असेल तर सीमाताईंना पुन्हा आमदार करावेच लागेल. सर्वसामान्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या सीमाताईंना तिसऱ्यांदा निवडून आणावेच लागणार. संपूर्ण मतदारसंघाच्या घराघरात आणि नागरिकांच्या मनामनात सीमाताईंनी स्थान मिळवलेले असल्याने त्यांचा विजय ही केवळ औपचारिकता शिल्लक असल्याचा विश्वास मान्यवरांनी यावेळी व्यक्त केला.
हे देखील वाचा : Nashik Political : ॲड. राहुल ढिकले यांच्या नाशिकरोड प्रचार कार्यालयाचे उद्घाटन
दरम्यान, यावेळी रामहरी संभेराव, भिवानंद काळे, किरण देशमुख, दिलीप शिंदे, बाळासाहेब भोजने, सुरेंद्र अलई, किरण पाटोळे, गणेश बोलकर, रवींद्र जोशी, बाळू हिरे, संजय राऊत, निलेश जोशी, दशरथ लोखंडे, शिवाजी शहाणे, भरत शिरसाट,गणेश नवले, रवींद्र उगले, रवी भोर, गौरव बोडके, आकाश पवार, जान्हवी तांबे, कल्पना पाटोळे, धनश्री गिरासे, प्रतिभा देवरे, संगीता शेळके, मनोज तांबे, अरुण पवार, संदेश पाठक, रवी बोडके, अशोक नागरे, कल्पना जोशी, योगेश मालुंजकर, संजय गायकवाड, भरत शिरसाट, पुष्पा आव्हाड, साहेबराव आव्हाड, दीपक व्याळीज, गणेश ठाकूर, जितेंद्र चोरडिया आदींसह महायुतीचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील क्लिक करा