अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
केळी व्यापार्याचे ऑफीस फोडत रोकड लंपास करणार्या संशयित आरोपीला कोतवाली पोलिसांनी अवघ्या दोन तासात जेरबंद केले आहे. चंद्रकांत दिगंबर इंगळे (रा. दुधसागर सोसायटी केडगाव) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
या संदर्भात कोतवाली पोलिस ठाण्यात सागर गायकवाड यांनी तक्रार दाखल केली होती. केळाचे गोडावूनचे ऑफिस चोरट्याने कुलूप तोडुन आतील 1 लाख 10 हजारांची रोकड लंपास केली होती. हा गुन्हा फिर्यादीकडे काही दिवसांपूर्वी काम सोडून गेलेला कामगार यांने केला असल्याची माहितीसमोर आली. त्यानंतर कोतवाली पोलिस ठाण्यांचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी कारवाईच्या सुचना पोलिसांना दिल्या. चंद्रकांत इंगळे (रा. दुधसागर सोसायटी केडगाव) यांचा शोध घेत त्यांच्याकडे गुन्ह्याचे अनुषंगाने चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुल केला.
तसेच लपवुन ठेवलेले 1 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात दिला. सदरची कारवाई निरीक्षक दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवीण पाटील व गुन्हेशोध पथकाचे अंमलदार दीपक रोहोकले, योगश भिंगारदिवे, गणेश धोत्रे, सुर्यकांत डाके, विक्रम वाघमारे, अविनाश वाकचौरे, सलीम शेख, अभय कदम, अमोल गाडे, सतिष शिंदे, तानाजी पवार यांनी केली.