Tuesday, September 22, 2026
Homeक्राईमAhilyanagar : सरकारी कामात अडथळा आणणार्‍यास सक्तमजुरी

Ahilyanagar : सरकारी कामात अडथळा आणणार्‍यास सक्तमजुरी

महापालिकेच्या कर्मचार्‍याला केली होती दमदाटी

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

महापालिकेच्या मोकाट जनावरे पकडण्याच्या सरकारी कामात अडथळा आणून कर्मचार्‍यांना दमदाटी व शिवीगाळ केल्याप्रकरणी आरोपी सागर गोपीनाथ हरबा (वय 35, रा. पारशाखुंट, हातमपुरा) यास न्यायालयाने सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. एम. तायडे यांनी हा निकाल दिला. सरकारी वकील म्हणून मंगेश दिवाणे यांनी काम पाहिले. या प्रकरणाची घटना 11 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी जुनी वसंत टॉकीज परिसरात घडली होती.

- Advertisement -

अहिल्यानगर महानगरपालिकेने शहरातील मोकाट जनावरे पकडणे, त्यांच्यासाठी चारा व पाण्याची व्यवस्था करणे तसेच देखभाल व औषधोपचार करण्याचे काम टेंडर पध्दतीने पिपल फॉर अ‍ॅनिमल या संस्थेला दिले होते. त्यानुसार महापालिका कर्मचारी सुनील मुरलीधर भोसले हे संबंधित संस्थेच्या कर्मचार्‍यांसह कर्तव्य बजावत होते. घटनेच्या दिवशी संबंधित कर्मचार्‍यांना तीन मोकाट जनावरे आढळून आली. कर्मचार्‍यांनी ही जनावरे पकडून महापालिकेच्या ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये चढविली आणि दाव्याला बांधली. त्याचवेळी आरोपी सागर हरबा तेथे आला. त्याने भोसले यांना दमदाटी करून शिवीगाळ केली तसेच ट्रॉलीमधील जनावरे सोडून देण्यास सांगितले.

भोसले व इतर कर्मचार्‍यांनी आरोपीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने महापालिकेच्या ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये चढून फिर्यादीची परवानगी न घेता बांधलेली जनावरे सोडविली. त्यानंतर ट्रॉलीचे फाळके काढून जनावरे घेऊन तो निघून गेला. या प्रकारामुळे महापालिका कर्मचार्‍यांच्या शासकीय कर्तव्यात अडथळा निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेनंतर भोसले यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. खटल्याच्या सुनावणीदरम्यान पाच साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. सरकार पक्षाने सादर केलेला पुरावा आणि करण्यात आलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवत शिक्षा ठोठावली.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेचा लवकरच निवडणूक कार्यक्रम

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar गेल्या काही महिन्यांपासून प्रशासकांच्या ताब्यात असलेल्या अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादीचा टप्पा पूर्ण झाला आहे. त्यामुळे आता प्रत्यक्ष...