Saturday, May 4, 2024
HomeजळगावPhotos # अरे देवा...दोन दिवसात दुरुस्त केलेल्या रस्त्यावर पुन्हा खड्डे!

Photos # अरे देवा…दोन दिवसात दुरुस्त केलेल्या रस्त्यावर पुन्हा खड्डे!

निकृष्ठ कामांकडे प्रभाग अधिकारी, लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष

अर्धवट केलेल्या डांबरची मलमपट्टी दोन दिवसात उखडली

- Advertisement -

शहरातील सर्व रस्त्यांची दयनीय अवस्था

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

आस्वाद चौक ते गिरणा टाकी (Aswad Chowk to Girna Tank) दरम्यानच्या खराब रस्त्याच्या दुरूस्तीच्या (Poor road repair) कामास सहा महिन्यानंतर मक्तेदाराने (monopoly) रविवार 30 ऑक्टोबरपासून सुरूवात केली. रस्त्यातील खड्डे (Potholes in the road) डांबर मिश्रीत गिट्टीने (With asphalt mixed ballast) बुजविले. पण दुसर्‍याच दिवशी या बुजविलेल्या (Extinguished) खड्ड्यातील डांबर निघत (Asphalt in the pit is coming out) असून पुन्हा तेथे खड्डे पडायला (fall into the pits again) लागले आहे. या निकृष्ठ कामाकडे (menial work) मनपाचे प्रभाग अधिकारी (Municipal Ward Officer) तसेच लोकप्रतिनिधीचे (People’s Representatives) दुर्लक्ष (ignore) होत असल्याचे नागरिकांडून बोलले जात आहे.

जळगाव शहरातील सर्व रस्त्यांची अवस्था दयनीय असून नागरिकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांच्या कामांना सुरवात झाली आणि काही रस्ते पुर्ण झाले. पण काही ठिकाणचे रस्ते अर्धवट अवस्थेत असून तेथील काम थांबलेले आहे. त्यात आस्वाद चौक ते गिरणा टाकी दरम्यानचा रस्त्याच्या कामांना सहा महिन्या आधिच मंजूरी असतांना मक्तेदाराने उशीरा काम सुरू केले. त्यात अर्धवट केलेल्या रस्त्यावरील डांबरची मलमपट्टी ही दोन दिवसात निघून आलेली आहे.

आयुक्तांनी पाहणी करावी

वर्क ऑडर देवून सहा महिने उशीरा मक्तेदाराने या रस्ता दुरुस्तीचे काम सुरू केले. परंतू डांबराने बुजविलीले खड्डे दोन दिवसात पुन्हा उखडले आहे. अशा खराब कामाची पाहणी आयुक्तांनी करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

झालेल्या रस्त्यांची आयुक्त पाहणी करणार

शासनाच्या 42 कोटी रुपये निधीतून दहा रस्त्यांचे काम सार्वजनीक बांधकाम विभागाकडून मक्तेदारांच्या मार्फत केले जाणार होते. परंतू केवळ पाच कोटी रुपये मिळाले असून त्यातून पाच रस्ते केले असल्याचे मक्तेदारांचा दावा आहे. याबाबत महापालिका आयुक्त डॉ. विद्या पाटील या मक्तेदाराने केलेल्या रस्त्यांची पाहणी करणार आहे.

लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष

प्रभाग बारा मधील हा रस्ता असून या रस्त्याबाबत महापालिकेत आमदारांनी घेतलेल्या आढावा बैठकीत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावरून त्वरीत या रस्त्याचे काम करण्याच्या सुचना दिल्या होत्या. आठ दिवसांनी मक्तेदाराने काम सुरू केले परंतू ते ही थातुरमातूर काम केल्याने पुन्हा या रस्त्यात खड्डे पडत आहे. खड्डे बुजविण्याचे काम व्यवस्थित झाले की नाही हे पाहणे लोकप्रतिनिधीची जबाबदारी होती. परंतू लोकप्रतिनिधींचे देखील दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

कामाच्या गुणवत्तेवर प्रश्न

मक्तेदाराने आस्वाद चौक ते गिरणा टाकीदरम्यानचा रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या काम अर्धवट केले. डांबराचा एक थर त्यानंतर डांबर मिश्रीत गिट्टी टाकून त्यावर रोलींग असे थातुरमातूर काम मक्तेदाराने केले आहे. त्यामुळे मक्तेदारांच्या कामांच्या गुणवत्ता तपासण्याचे कामावर कोणाचेच लक्ष नसल्याचे दिसून येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या