Monday, June 24, 2024
Homeनगरतेलाचे 30 डबे लंपास करून फसवणूक

तेलाचे 30 डबे लंपास करून फसवणूक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

100 डबे खाद्यतेलाची ऑर्डर सांगून त्यातील 30 डबे लंपास करून व्यावसायिकाची 45 हजाराची फसवणूक केली. याप्रकरणी व्यावसायिक संकल्प संजय गांधी (वय 32 रा. साईनगर, बुरूडगाव रस्ता) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून एका मोबाईल नंबर धारक अनोळखी व्यक्ती विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी यांचा केडगाव उपनगरात खाद्यतेलाचा व्यवसाय आहे. फिर्यादी ऑर्डर प्रमाणे ग्राहकांना माल पोहोच करत असतात. त्यांना 26 ऑगस्ट रोजी एका मोबाईल नंबरवरून फोन आला व सुवर्णज्योत हॉटेल, शेंडी बायपास येथून हॉटेलचा मॅनेजर बोलतो असे सांगून आम्हाला 100 डबे खाद्यतेलाची आवश्यकता आहे, सुवर्णज्योत हॉटेल येथे 100 डबे खाद्यतेल पोहोच करा, असे सांगितले. फिर्यादी यांनी स्वप्निल सोनटक्के (रा. भिंगार) यांच्या वाहनातून 100 डबे सुवर्णज्योत हॉटेल येथे पाठविले असता त्या ग्राहकाने 30 डबे सुवर्णज्योत हॉटेल येथे ठेवण्यास सांगितले व 70 डबे पांढरीपुल येथे नेण्यास सांगितले असल्याचे सोनटक्के यांनी फिर्यादीला कळविले.

दरम्यान, सोनटक्के यांनी 30 डबे सुवर्णज्योत हॉटेल येथे खाली करून 70 डबे पांढरीपुल येथे नेले असता तो ग्राहक सदर ठिकाणी नव्हता. सोनटक्के यांनी सुवर्णज्योत येथे ठेवलेल्या 30 डब्यांचा शोध घेतला असता ते मिळून आले नाही. आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्ष्यात आले. दरम्यान, फिर्यादी कामानिमित्त बाहेरगावी होते. तेथून आल्यानंतर त्यांनी बुधवारी (दि. 1) पोलिसांत फिर्याद दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या