नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
ओमानमधून येमेनच्या दिशेनं जाणारे तेलवाहू जहाज बुडाल्याची माहिती मिळत आहे. ओमानच्या सागरी सुरक्षा केंद्राने यासंदर्भात माहिती दिली आहे. मंगळवारी रात्री उशिरा ११७ मीटर लांबीचे तेलवाहू जहाज ओमानच्या किनाऱ्यावर बुडाले. या जहाजावर असलेले १६ जण बुडाले आहेत. यामध्ये १३ भारतीय नागरिकांचा समावेश आहे. या सर्वजणांचा शोध घेतला जात आहे. तसेच, तीन जण श्रीलंकेचे नागरिक आहेत.
ओमानच्या सागरी सुरक्षा केंद्राने मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, १३ भारतीयांसह १६ क्रू मेंबर्सना घेऊन जाणारे एक तेलवाहू जहाज ओमानच्या किनाऱ्याजवळ बुडाले आहे. क्रू मेंबर्स बेपत्ता असून, त्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जहाज बुडाल्यानंतर हे सर्व जण बेपत्ता झाले. या सर्व बेपत्ता सदस्यांची शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. परंतु अद्याप यापैकी कोणाचाही शोध लागलेला नाही. या तेलवाहू जहाजाचे नाव प्रेस्टिज फाल्कन असे होते.
या तेलवाहू जहाजावर पूर्व आफ्रिकन देश कोमोरोसचा ध्वज होता. मंगळवारी हा तेलवाहू जहाज ओमानच्या इंडस्ट्रियल डुक्म नावाच्या मुख्य बंदराजवळ अचानक बुडाले. तेलवाहू जहाज बुडाल्यानंतर बेपत्ता झालेल्या लोकांचा अद्याप कोणताही सुगावा लागलेला नाही. या सर्वांचा शोध सुरू आहे.
दरम्यान, ओमानच्या दक्षिण-पश्चिम किनाऱ्यावर स्थित दुक्म बंदर, देशातील प्रमुख तेल आणि वायू खाण प्रकल्पांसाठी एक महत्त्वाचे केंद्र आहे. राज्यातील सर्वात मोठा सिंगर इकॉनॉमिक प्रकल्प, डुकमच्या विशाल औद्योगिक क्षेत्राचा एक प्रमुख तेल शुद्धीकरण कारखाना आहे.
व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील क्लिक करा