Thursday, May 21, 2026
Homeब्रेकिंग न्यूजओझे : बिबट्याच्या हल्ल्यात मेंढपाळ जखमी

ओझे : बिबट्याच्या हल्ल्यात मेंढपाळ जखमी

बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाकडून लावला पिंजरा

- Advertisement -

ओझे । विलास ढाकणे OZE

दिंडोरी तालुक्यातील ओझे येथे काल 7 वाजेच्या दरम्यान हरीश कारभारी निगळ यांच्या वालवडीच्या शेतात मेंढपाळ अजय तुकाराम गोयकर (29) नराळा ता. जि. नंदुरबार हे मेंढ्यांना वालवड तोडण्यास गेले असता त्यावर पाठीमागून आलेल्या बिबट्याने हल्ला करून त्यांना जखमी करण्यात आले. जखमी अजय गोयकर यांना नाशिक शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्या कुटूंबाच्या वतीने सांगण्यात आले. ओझे परिसरात दोन दिवसात बिबट्याने दुसरा हल्ला केल्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

काल सकाळी मेंढपाळ अजय तुकाराम गोयकर व तुळशीराम ज्योतीराम सूळ रा. विजयापूर ता. साक्री हे दोघे मेंढ्यांना चारा आण्यासाठी ओझे येथील हरेश कारभारी निगळ यांच्या शेतात गट क्रमांक 105 मध्ये वालवडीचा चारा घेण्यासाठी गेले असता काही वेळातच बिबट्याचे अजय तुकाराम गोयकर यांच्यावर पाठीमागून हल्ला केला. यावेळी त्यांनी जोरात आरडाओरडा केला. या आवाजाराने बिबट्याने धुम ठोकली. या हल्ल्यात अजय गोयकर हे जखमी झाले आहे. त्यांना दिंडोरी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तेथे काही महत्त्वाची लस नसल्यामुळे त्यांना नाशिक येथे शासकीय रुग्णालयात दाखल आले आहे. तेथे डॉक्टरांनी उपचार करुन सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

सदर घटनेची वनविभागाने दखल घेवून हल्ल्याच्या ठिकाणाची पाहणी करून पंचनामा केला असून त्यांच ठिकाणी पिंजराही लावण्यात आला आहे. मात्र ओझे परिसरात दोन दिवसाच्या अंतराने दुसरा बिबट्याचा हल्ला झाल्यामुळे संपूर्ण ओझे गावामध्ये बिबट्यांची दहशत निर्माण झाली आहे. रोज कुठे ना कुठे नागरिकांना बिबट्यांचे दर्शन होत असल्यामुळे भितीचे वातावरण झाले आहे. ओझे, करंजवण, म्हेळूस्के, लखमापूर हा संपूर्ण परिसर कादवा नदीचा व उसाच्या शेती परिसर असल्यामुळे बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याचप्रमाणे आता जंगलाप्रमाणे ऊसाच्या शेतातच यांच्या पिढ्या तयार होत असल्यामुळे कुत्रे, मांजरे प्रमाणे या बिबट्यांची संख्या वाढणार की काय? अशी चर्चा सर्वत्र होत आहे.

बिबट्यांच्या हल्ल्याचे प्रमाण दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने शेतकरी वर्गासाठी अतिशय चिंतेची बाब असून वनविभागाने येत्या काळात सतर्क राहण्याचे आवाहन जनतेकडून केली जात आहे. या हल्ल्याबाबत वनविभागाला माहिती मिळताच वनविभागाच्या वतीने वन परिक्षेत्र अधिकारी सुशांत पाटील, वनपाल भटू बागुल, वनरक्षक गोरख गांगोडे, वनरक्षक योगेश दळवी, वनमजूर सचिन गांगोडे यांनी या परिसरात पिंजरा लावण्यात आला आहे.

ओझे परिसरामध्ये दिवसेंदिवस बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे शेतकरी व शेतमजूर यांनी शेतात काम करताना सावधानता बाळगावी. वनविभागाने या परिसरात बिबट्यांपासून संरक्षण कसे करावे याबाबत गावागावात जाऊन प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. यामुळे काही प्रमाणात बिबट्यांचे होणारे हल्ले रोखता येतील किंवा नागरिकांना बिबट्यांपासून बचाव करता येईल.
भाऊसाहेब ढाकणे, पोलिस पाटील, ओझे

ताज्या बातम्या

Shrirampur : महिलांवर दगडफेकीच्या निषेधार्थ रामपूर-नाऊर ग्रामस्थ आक्रमक

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur श्रीरामपूर तालुक्यातील रामपूर कोकरे परिसरातील गोदावरी नदीपात्रातील वाळूपट्ट्याच्या लिलावाविरोधात ग्रामस्थांनी तीव्र आक्रमक भूमिका घेतली असून, महिलांवर झालेल्या कथित दगडफेकीच्या घटनेनंतर रामपूर व...