Friday, March 28, 2025
Homeनंदुरबार10 जुलैपासून ओखा-मदुराई साप्ताहिक रेल्वे सुरु होणार

10 जुलैपासून ओखा-मदुराई साप्ताहिक रेल्वे सुरु होणार

नंदुरबार । प्रतिनिधी nandurbar

ओखा-मदुराई व मदुराई-ओखा ही साप्ताहिक विशेष रेल्वे सुरु करण्यात येणार आहे. सदर रेल्वे दि.10 जुलै ते 31 जुलै या कालावधीत दर सोमवारी रात्री 10 वाजता ओखा येथून निघेल आणि गुरुवारी सकाळी 11.45 वाजता मदुराईला पोहोचेल.

- Advertisement -

तसेच मदुराई-ओखा साप्ताहिक स्पेशल दि.14 जुलै ते 04 ऑगस्ट दरम्यान दर शुक्रवारी (गुरुवार रात्री नंतर) मदुराईहून रात्री 1.15 वाजता सुटेल आणि रविवारी सकाळी 10 वाजता ओखा येथे पोहोचेल. सदर रेल्वेमध्ये 1 एसी टू टायर, 2 एसी थ्री टायर, 12 स्लिपर, 4 द्वितीय श्रेणी सामान्य आणि 02 एसएलआर असे एकूण 21 डबे असतील. ओखा, द्वारका, जामनगर, राजकोट, सुरेंद्रनगर, अहमदाबाद, नडियाद, आनंद, वडोदरा, भरूच, सुरत, नंदुरबार, अमळनेर, जळगाव, भुसावळ, अकोला, पूर्णा, नांदेड, महबूबनगर, गुटी, रेनिगुंटा, कटपाडी, वेल्लोर, तिरुवन्नमलाई, विल्लुपुरम, श्रीरंगम, तिरुचिरापल्ली, मानपराई, दिंडीगुल, कोडाई कालवा, कुडाळ नगर या मार्गाने ती मदुराईला पोहचेल.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

0
नाशिकरोड | प्रतिनिधी Nashikroad नाशिक-पुणे महामार्गावर असलेल्या गांधीनगर जवळील विजय ममता चित्रपटगृहाजवळ ट्रॅक्टरची वाहतूक करणाऱ्या ट्रकची एका तरुणाला जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात एक युवक...